शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अंबानी रुग्णालयाबाबतची पोस्ट व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:57 AM

खालापूर तालुक्यातील अंबानी रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात मश्गूल झाल्याचे दिसून येते.

आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सरकारी रुग्णालयाची प्रचंड दुरवस्था झाली असताना दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक खालापूर तालुक्यातील अंबानी रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात मश्गूल झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अंबानी रुग्णालयाची चौकशी करण्याबाबतची पोस्ट त्यांनीच सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. डॉ.गवळी यांनी व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर चौकशीबाबतचा अहवाल आणि काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयाची झालेली दुरवस्था आधी बघा, त्यानंतर दुसºया रुग्णालयाची चौकशी करा, अशा प्रतिक्रि या उमटल्या आहेत.अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. याच रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च करून त्याचे रुपडे पालटण्याचा प्रयत्न सुरू आहे. नूतनीकरणावर १० कोटी रु पये खर्च हे थोडे जास्तीच वाटत असल्याने तेवढ्या निधीमध्ये नवीन रुग्णालय बांधून झाले असते, अशा प्रतिक्रि या मध्यंतरी जनसामान्यांमध्ये उमटल्या होत्या. कोट्यवधी रुपये खर्चूनही रुग्णालयाची बकाल अवस्था झाली आहे. इमारतीला गळती लागली आहे, तर प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. उघड्या नाल्यांमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लिफ्ट बंद असल्याने रु ग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीला काही ठिकाणी शेवाळ लागले आहे. काही मजल्यांवर तर झाडेही उगवली आहेत. शवागृहाचे छप्पर गळत असल्याने त्याला चक्क मेनकापडाचे आच्छादन लावण्यात आले आहे. शवागृहामध्ये शीतपेटी नसल्याने मृत पावलेल्या रुग्णाची हेळसांड होत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आजार पसरण्याची शक्यता निर्माण झालीआहे.काहीच दिवसांपूर्वी औषध भांडार गृहामध्ये गळती झाल्याने शेकडो औषधांचे बॉक्स भिजले होते. रुग्णालयाच्या परिसराचीही योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्याने रुग्णालयाला बकाल स्वरूप आल्याचे दिसून येते.रु ग्णालयाकडे कमी मनुष्यबळ असल्याने थोड्याफार प्रमाणात अडचणी निर्माण होतात, परंतु त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊ दिला जात नाही. शवागृहाचे काम प्रगतिपथावर आहे. अंबानी रु ग्णालय हे सीएसआरमधून चालवले जाते. तेथे अनागोंदी कारभार होत असल्याच्या नागरिकांच्याच तक्र ारी आहेत.-डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सकरु ग्णालयामध्ये मुख्य दारातून प्रवेश करताना रँप नसल्याने उपचारासाठी येणाºया रु ग्णांना विशेष करून वयोवृद्ध आणि गरोदर स्त्रियांना त्याचा अधिक त्रास होतो. याच्यासह अन्य गैरसोयी असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी हे खालापूर तालुक्यातील अंबानी रु ग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासाठी जातात. हा फार मोठा विरोधाभास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रु ग्णालयात आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत. तेथे डॉक्टर उपलब्ध असणे, रु ग्णासह त्यांच्या नातेवाइकांशी आदराने बोलणे, स्वच्छता असणे या गोष्टी असणे अत्यंत महत्त्वाच्या आहे, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले.ज्या कॅम्पसमध्ये स्वत: डॉ.गवळी बसतात त्यांना या गोष्टी दिसत नाहीत हे नवलच म्हणावे लागेल. असे असताना ते दुसºया रु ग्णालयाची चौकशी करतात. त्यांनी ते जरूर करावे, परंतु आपल्याकडे काय चालले आहे याच्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हारु ग्णालयाच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रवादी लवकरच डॉ.गवळी यांची भेट घेणार असल्याचेही ढवळे यांनी सांगितले.