व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे अतिक्रमणविरोधी कारवाई स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2015 12:28 AM2015-08-26T00:28:58+5:302015-08-26T00:28:58+5:30

अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने तुर्भे येथील जनता मार्केटमधील नियोजित मोहीम महापालिकेला स्थगित करावी लागली. त्यामुळे कारवाईसाठी

Postponement of anti-encroachment proceedings due to opposition from traders | व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे अतिक्रमणविरोधी कारवाई स्थगित

व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे अतिक्रमणविरोधी कारवाई स्थगित

Next

नवी मुंबई : अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने तुर्भे येथील जनता मार्केटमधील नियोजित मोहीम महापालिकेला स्थगित करावी लागली. त्यामुळे कारवाईसाठी तैनात करण्यात आलेला कर्मचाऱ्यांचा फौजफाट व पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
तुर्भे येथील जनता मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांना महापालिकेने रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली. मात्र व्यापाऱ्यांनी या कारवाईच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाला ही मोहीम स्थगित करावी लागली. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे नव्हे, तर काही तांत्रिक कारणास्तव आजची मोहीम रद्द करण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Postponement of anti-encroachment proceedings due to opposition from traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.