वाशी सेक्टर 26 मधील परिवहनच्या जागेवर होणाऱ्या ट्रक टर्मिनलच्या कामाला पालकमंत्र्यांची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 08:26 PM2021-06-03T20:26:45+5:302021-06-03T20:26:56+5:30
आज मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत होणारे ट्रक टर्मिनलची जागा ही परिवहनसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे.
नवी मुंबई: वाशी सेक्टर २६ मधील परिवहन डेपो साठी आरक्षित असलेल्या १५ हजार स्क्वेअर मीटर भूखंडावर ट्रक टर्मिनल उभारण्याचे काम सिडको मार्फत सुरू करण्याचा घाट घालत होते. हा नव्याने होणारा ट्रक टर्मिनल लोकवस्तीत असल्याने नागरिकांचा याला विरोध होता. ही बाब माजी नगरसेवक विलास भोईर यांनी खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी परिवहन मंत्री अनिल परब तसेच महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही बाब पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली. त्यांनी या कामाला तात्पुरती स्थगिती दिली होती.
आज मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत होणारे ट्रक टर्मिनलची जागा ही परिवहनसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. सदर जागा परिवहन विभागाने सिडकोकडून विकत घेतल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तसेच या लोकवस्तीत ट्रक टर्मिनल उभे राहिल्यास शेजारी ए पी एम सी मार्केट मधील अवजड वाहनांमुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकते. तसेच या अवजड वाहनांमुळे सदर ठिकाणी कोणतेही अपघात घडण्याची दाट शक्यता बाळगता येत नाही. असे खासदार राजन विचारे म्हटलं.
त्यावर अखेर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर परिवहनसाठी आरक्षित असलेली जागा परिवहनसाठी आरक्षित ठेवावी कारण सदर लोकवस्तीतील शाळा -कॉलेज मधील १२ हजार विद्यार्थी या परिसरात ये जा करीत असतात. त्यामुळे नागरिकांचा विरोध असल्याने या कामाला स्थगिती द्यावी असे आदेश पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना दिले. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, नगरसेवक एम के मढवी शिवराम पाटील, विलास भोईर, पी सी पाटील, एच बी पाटील, प्रवीण म्हात्रे, उपशहर प्रमुख सतीश नवले तसेच सिडकोचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.या निर्णयामुळे समस्त नागरिकांच्या वतीने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.