फेसबुकवर अतिरेकी संघटनेशी संबंधित पोस्ट
By admin | Published: April 19, 2016 02:26 AM2016-04-19T02:26:59+5:302016-04-19T02:26:59+5:30
तालुक्यात चमत्कारिक व वादग्रस्त घटना घडण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी अशाच प्रकारची घटना पुढे आली आहे. फेसबुकवर आपण पाकिस्तानचे आयएसआय संघटनेशी संबंधित असल्याची पोस्ट
खालापूर : तालुक्यात चमत्कारिक व वादग्रस्त घटना घडण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी अशाच प्रकारची घटना पुढे आली आहे. फेसबुकवर आपण पाकिस्तानचे आयएसआय संघटनेशी संबंधित असल्याची पोस्ट आल्याची व याचबरोबर अनेक अश्लील पोस्टही आल्याची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून खालापूर परिसरात माहिती व तंत्रज्ञान व साधनांचा दुरुपयोग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
येथील म्हाडा रहिवासी भागात राहत असलेले मुश्फिक बदूद राजपूत (२२) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर २४ मार्च ते ९ एप्रिल २०१६ या कालावधीत तीन वेळा राजेस-राजेस या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून आपण पाकिस्तानमधील आयएसआय या संघटनेशी संबंधित असल्याची पोस्ट आली. तसेच याच कालावधीत विविध प्रकारच्या अश्लील पोस्ट अज्ञात व्यक्तीने केल्या असल्याची तक्रार तक्र ारदार मुश्फिक याने दिली आहे. ही बाब खालापूर पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून, या तक्रारी बाबत खालापूर पोलिसांत सी.आर. नंबर ०५/२०१६ ङ्क्तमाहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ८७ भादंवि ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे तपास पथक करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खालापुरात उघडकीस आलेल्या या प्रकाराने सर्वत्र खडबळ उडाली असून, फेसबुकसह इतर माहिती व तंत्रज्ञानसंबंधी तंत्र हाताळताना नागरिकांनी विशेष सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. मात्र संबंधित तक्र ारदाराने उशिरा तक्रार का दिली असल्याचे पोलिसांनी माहिती देताना स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)