स्टील मार्केटमध्ये विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:01 AM2018-08-09T03:01:35+5:302018-08-09T03:02:18+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठ्या कळंबोली स्टील मार्केटमध्ये इतर पायाभूत सुविधांची वानवा आहेच, त्याचबरोबर विजेचाही लपंडाव सुरू असतो.

Power hinges in the steel market | स्टील मार्केटमध्ये विजेचा लपंडाव सुरूच

स्टील मार्केटमध्ये विजेचा लपंडाव सुरूच

googlenewsNext

- अरूणकुमार मेहत्रे 
कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठ्या कळंबोली स्टील मार्केटमध्ये इतर पायाभूत सुविधांची वानवा आहेच, त्याचबरोबर विजेचाही लपंडाव सुरू असतो. त्यामुळे स्टील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत महावितरणकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालल्याचा आरोप व्यापाºयांनी केला आहे.
कळंबोली येथील ३0२ हेक्टर जमिनीवर १२५, २५0, ४५0, ९00 चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६0 भूखंड पाडण्यात आले आहेत. या ठिकाणी सिडकोने दुर्लक्ष केल्यामुळे पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्याचबरोबर वीजपुरवठा सुद्धा नियमित केला जात नाही. स्टील मार्केटला स्वतंत्र सबस्टेशन नाही. तळोजा येथून ओव्हरहेड वाहिनीने पूर्वी वीजपुरवठा केला जात होता. याच वाहिनीवर कळंबोली आणि रोडपाली, मार्बल मार्केटचा भाग आहे. आता अंडरग्राउंड वीज वाहिनी टाकण्यात आलेली आहे, परंतु येथून होणारा विद्युत पुरवठा सुद्धा खंडित होत आहे. लोहपोलाद मार्केटमध्ये लोखंडाची कटिंग तसेच इतर कामे करण्याकरिता विजेची गरज लागते. परंतु वारंवार खंडित होणाºया विद्युत पुरवठ्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. यासंदर्भात अनेकदा तक्र ारी करूनही उपाययोजना होत नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
।स्वतंत्र उपकेंद्र
आणि फिडर द्या
आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट असूनही येथे स्वतंत्र वीजपुरवठा करणारी यंत्रणा नाही. तळोजा येथील सबस्टेशनवरून विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी स्टील मार्केटला नियमित वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र उपकेंद्राची उभारणी करणे गरजेचे आहे.
- दीपक निकम,
संचालक, स्टील चेंबर
।वारंवार लाइट जात असल्याने आमच्या कामाचा खोळंबा होतो. त्यामुळे आमचा माल वेळेत बाहेर जात नाही. अनेकदा आर्थिक नुकसान होते, तसेच कामाचा उरक होत नाही. वेळेवर वीज बिल अदा करूनही आम्हाला अखंडित वीज मिळत नाही.
- नितीन करवत,
लोखंड व्यापारी
स्टील मार्केट परिसरात तळोजा येथून वीजपुरवठा केला जातो. चौदा कि.मी. अंतराची ही वाहिनी आहे. त्यावर कळंबोली वसाहत सुद्धा आहे. तसेच फूड लँडजवळ एक वाहिनी तुटली आहे. कुठेही अडचण आली तरी येथील वीजपुरवठा खंडित होतो. याकरिता उपाययोजना सुरू आहेत.
- सोमेश्वर घुमे,
सहायक अभियंता, महावितरण

Web Title: Power hinges in the steel market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.