१७ ग्रामपंचायतीतील सत्ता संघर्ष टिपेला; गाव कारभारी कोण याचा फैसला मतपेटीत बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 10:03 PM2022-12-17T22:03:15+5:302022-12-17T22:04:11+5:30
राजकीय पक्षांनी ध्येय धोरणे पायदळी: तत्व, निष्ठेलाही तिलांजली; अभद्र युती-आघाड्यामुळे मतदार संभ्रमात
मधुकर ठाकूर
उरण : आगामी होऊ घातलेल्या झेडपी,पंचायत समिती,नगरपरिषद निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (१८) मतदान होत आहेत. १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी विविध राजकीय पक्षांचे ५३ तर १७ ग्रामपंचायतीच्या १५१ सदस्य पदासाठी ३७१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
राजकीय पक्षात कुणाचा पायपोस कुणालाच उरलेला नाही. सत्ता हेच प्रमुख उद्दिष्ट असलेल्या विविध प्रमुख राजकीय पक्षांनी ध्येय धोरणे, तत्व, निष्ठेला तिलांजली दिली आहे. कमरेचे गुंडाळून अभद्र युती-आघाड्या करत सत्तेसाठी एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत.काही ग्रामपंचायतींमध्ये तर भाजप- सेना-शेकाप, कॉंग्रेस- राष्ट्रवादी एकत्रित येऊन अपक्ष-गावआघाडी विरोधात निवडणूक लढवित आहेत.तर काही ग्रामपंचायतींमध्ये फायदा होईल त्या पक्षाशी संधान बांधून निवडणूक लढविल्या जात आहेत.
बाहेर परस्परांविरोधात गलिच्छ आरोप करणारे राजकीय पक्ष सत्तेसाठी लाचारी पत्करत एकत्र येऊन निवडणूक लढवित असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहेत.या अभद्र राजकीय युती-आघाड्यांमुळे मात्र मतदार चांगलेच संभ्रमात सापडले आहेत.
उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायती
ग्रामपंचायत प्रभाग सदस्य उमेदवार मतदार
नाव. संख्या संख्या संख्या संख्या
पाणजे - ०३ ०७ २१ ११८२
डोंगरी- ०३ ०७ १५ १२३१
रानसई - ०३ ०७ १४ ९८५
पुनाडे- ०३ ०७ १४ ९५८
सारडे- ०३ ०७ १७ १३३३
नवीनशेवा- ०३ ०९ ३१ २१३६
धुतुम- ०३ ०९ १८ १७१७
करळ- ०३ ०९ २१ १३१५
कळंबुसरे- ०३ ०९ १९ १६८७
बोकडविरा- ०३ ०९ २६ २१४२
वशेणी- ०३ ०९ १९ ३०१६
पागोटे- ०३ ०९ १८ ११५६
पिरकोन- ०४ ११ २२ ३१३२
जसखार- ०४ ११ ३१ १९९१
चिर्ले - ०४ ११ २६ २७५८
भेंडखळ- ०४ ११ ३४ २६३०
नवघर - ०५ १५ २५ २२८४
ग्रामपंचायती -१७
प्रभाग संख्या--- ५७
सदस्य संख्या -१५१
सदस्यपदासाठी निवडणूकीच्या रिंगणातील एकूण उमेदवार -३७१.
सरपंच संख्या -१७.
सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणातील एकूण उमेदवार -५३.
बिनविरोध -
घारापुरी - सरपंच-०१, सदस्य-०७,
नवघर-४,पुनाडे-१,भेंडखळ-१
एकूण सरपंच-०१, सदस्य -१३.
एकूण मतदार---३१६५३.
स्त्री --१६३८४.
पुरुष --१५१६८.
घारापुरी वगळून
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप,सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, पुढारी,आजी-माजी आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी सर्वांचीच प्रतिष्ठापणाला लागली आहे.
१७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या उध्दव ठाकरे शिवसेना-१२ लढवित असल्याचे तालुका अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी दिली. शेकापही सहा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असल्याची माहिती तालुका चिटणीस विकास नाईक यांनी दिली. कॉंग्रेस सरपंच पदासाठी सहा ग्रामपंचायत लढत असल्याचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी एकही जागा लढवित नसल्याचे तालुका अध्यक्ष मनोज भगत यांनी सांगितले.तर भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.
सरळ लढती : डोंगरी,रानसई,पुनाडे,धुतुम,कळंबुसरे,
वशेणी, पागोटे,पिरकोन,नवघर.
तिरंगी: पाणजे,सारडे,करळ,बोकडवीरा, जसखार, चिर्ले, भेंडखळ.
चौरंगी: नवीन शेवा
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"