महावितरणकडून छुपी वीज दरवाढ

By Admin | Published: February 3, 2017 02:47 AM2017-02-03T02:47:09+5:302017-02-03T02:47:09+5:30

महावितरणने नोव्हेंबर २०१६ पासून वीज बिलात छुपी वाढ केल्याची चर्चा आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून हे नाकारण्यात येत असले तरी प्रत्यक्ष आलेल्या वीज

Power tariff hike from MSEDCL | महावितरणकडून छुपी वीज दरवाढ

महावितरणकडून छुपी वीज दरवाढ

googlenewsNext

पनवेल : महावितरणने नोव्हेंबर २०१६ पासून वीज बिलात छुपी वाढ केल्याची चर्चा आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून हे नाकारण्यात येत असले तरी प्रत्यक्ष आलेल्या वीज बिलात दरवाढ झाल्याचे दिसत आहे. वीज नियामक आयोगाने याची दखल घेऊन फसवणूक थांबवण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.
महावितरणने डिसेंबर २०१६ च्या बिलात वहन आकार वेगळा दाखवल्याने ३५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांकडे विचारणा केली असता, यापूर्वी वहन आकाराचा समावेश वीज आकारात करण्यात येत होता, आता तो वेगळा दाखवण्यात येत आहे. ही दरवाढ नसून वीज नियामक आयोगाच्या परवानगीशिवाय वीज बिलात वाढ करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. ३ नोव्हेंबर २०१६ च्या आयोगाच्या आदेशानुसार वीज बिलात स्थिर आकार, वीज व वहन आकार हे दोन अस्थिर आकार अशा तीन भागात आकारणी केली आहे. या पूर्वी स्थिर व वीज आकार अशा दोन भागात विभागणी होत होती. घरगुती ग्राहकाच्या वीज दरात १ नोव्हेंबर २०१६ पासून नियामक मंडळाच्या आदेशाने सरासरी १.३ टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१६ पर्यंत घरगुती वापरासाठी १00 युनिटपर्यंत दर ३.७६ रुपये दाखवला आहे.

महावितरणने डिसेंबर २०१६ च्या बिलात वहन आकार फक्त वेगळा दाखवला आहे. कोणतीही दरवाढ केलेली नाही. नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे तो वेगळा दाखवल्याने ग्राहकांचा गैरसमज होत आहे.
- जगदीश बोकडे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण

Web Title: Power tariff hike from MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.