शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

महावितरणकडून छुपी वीज दरवाढ

By admin | Published: February 03, 2017 2:47 AM

महावितरणने नोव्हेंबर २०१६ पासून वीज बिलात छुपी वाढ केल्याची चर्चा आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून हे नाकारण्यात येत असले तरी प्रत्यक्ष आलेल्या वीज

पनवेल : महावितरणने नोव्हेंबर २०१६ पासून वीज बिलात छुपी वाढ केल्याची चर्चा आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून हे नाकारण्यात येत असले तरी प्रत्यक्ष आलेल्या वीज बिलात दरवाढ झाल्याचे दिसत आहे. वीज नियामक आयोगाने याची दखल घेऊन फसवणूक थांबवण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. महावितरणने डिसेंबर २०१६ च्या बिलात वहन आकार वेगळा दाखवल्याने ३५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांकडे विचारणा केली असता, यापूर्वी वहन आकाराचा समावेश वीज आकारात करण्यात येत होता, आता तो वेगळा दाखवण्यात येत आहे. ही दरवाढ नसून वीज नियामक आयोगाच्या परवानगीशिवाय वीज बिलात वाढ करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. ३ नोव्हेंबर २०१६ च्या आयोगाच्या आदेशानुसार वीज बिलात स्थिर आकार, वीज व वहन आकार हे दोन अस्थिर आकार अशा तीन भागात आकारणी केली आहे. या पूर्वी स्थिर व वीज आकार अशा दोन भागात विभागणी होत होती. घरगुती ग्राहकाच्या वीज दरात १ नोव्हेंबर २०१६ पासून नियामक मंडळाच्या आदेशाने सरासरी १.३ टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१६ पर्यंत घरगुती वापरासाठी १00 युनिटपर्यंत दर ३.७६ रुपये दाखवला आहे. महावितरणने डिसेंबर २०१६ च्या बिलात वहन आकार फक्त वेगळा दाखवला आहे. कोणतीही दरवाढ केलेली नाही. नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे तो वेगळा दाखवल्याने ग्राहकांचा गैरसमज होत आहे.- जगदीश बोकडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण