कचराकुंडीत आढळले पीपीई किट्स, निर्जंतुकीकरण करून उचलला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 01:25 AM2020-04-27T01:25:32+5:302020-04-27T01:25:36+5:30
भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीत चार ते पाच पीपीई किट्स टाकल्याचे आढळले. याबाबत खळबळ माजताच कचरा निर्जंतुकीकरण करून उचलण्यात आला.
नवी मुंबई : नेरुळमधील शिरवणेगाव येथील भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीत चार ते पाच पीपीई किट्स टाकल्याचे आढळले. याबाबत खळबळ माजताच कचरा निर्जंतुकीकरण करून उचलण्यात आला.
कोरोनामुळे शहरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे, आरोग्याच्या कामानिमित्त नागरिकांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्सेस, पोलीस आदीना पीपीई किट्स देण्यात आल्या आहेत. सदर किट्स वापरल्यानंतर ते इतर कचऱ्यापासून वेगळे ठेवण्यात येतात आणि ठरावीक पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. शिरवणे गावातील भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीत शनिवारी वापरलेल्या पीपीई किट्स आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याबाबत सफाई कमचाºर्यांनी वरिष्ठांना कळवले. त्यानंतर कचरा निर्जंतुक करून उचलण्यात आला. मात्र, या प्रकारानंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून महापालिका आणि पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी के ली.