अलिबाग : राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा सामान्य रु ग्णालय रक्तपेढीतर्फेसमाजात ऐच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी हा संदेश देण्यासाठी अलिबाग येथे सोमवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. अलिबागच्या उपनगराध्यक्षा सुरक्षा शहा यांनी प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखवून सुरु वात करण्यात आली. या प्रभात फेरीत निसर्ग विभागाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेऊन रक्तदान करा ते जीवनदान आहे या घोषवाक्यांनी जनजागृती केली. कार्यक्र म प्रसंगी अति. जिल्हा शल्य चिकित्सक ननावरे यांनी सांगितले की, आजवर विज्ञानाने कितीतरी प्रगती केली आहे. परंतु मानवी रक्ताला पर्याय नाही म्हणून कृत्रिम रक्त तयार करु शकले नाही. यासाठी मानवाचा जीव वाचवण्यासाठी माणसाचे रक्त माणसाला दिले जाते. रक्तपेढीच्या डॉ. निशा तेली यांनी रक्तपेढीची माहिती व ऐच्छिक रक्तदान शिबिर राबवून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करु न सामाजिक बांधिलकी जोपासावी. तर डॉ. दीपक गोसावी यांनी जानेवारीपासून आजपर्यंत जिल्ह्यात रक्तदान शिबिर व रक्तपेढी या माध्यमातून ४४०९ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या असल्याचे सांगितले. जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाचे डी. पी.ओ.संजय माने व रक्तपेढीच्या डॉ.निशा तेली, डॉ.दीपक गोसावी यांच्या अधिपत्याखाली हा उपक्र म राबविण्यात आला. कार्यक्र माला निवासी अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कोरे, मुख्य अधिसेविका मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी रक्तपेढीचे हेमकांत सोनार, वीरेंद्र स्वामी, प्रमोद जगताप आदिंनी परिश्रम घेतले.
अलिबागमध्ये रक्तदान जनजागृतीसाठी प्रभात फे री
By admin | Published: October 04, 2016 2:45 AM