पनवेल : शास्त्रज्ञ आणि अस्ट्रोनॉट कँडिडेट असलेल्या पनवेलच्या प्रणित पाटीलची ‘नासा’च्या मानव संसाधन प्रकल्पात सहअन्वेषक म्हणून निवड करण्यात आली आहे. मंगळावरील वाळवंटातील अनुसंधान प्रक्रियेसाठी लोकांच्या हालचालींचा शोध घेऊन मानवी सहभागाच्या झोपेच्या निर्णयक्षमतेबाबत अभ्यास या संशोधन प्रकल्पात केला जाणार आहे.
अमेरिकेतील युटा प्रांतात एमडीआरएस या संशोधन केंद्रावर हे संशोधन केले जाणार आहे. चंद्रावरील वातावरण या केंद्रावर कृत्रिमरीत्या तयार केलेले आहे. या संशोधनाला जानेवारी महिन्यात सुरु वात होणार आहे. याकरिता प्रणित पाटील हा जानेवारी महिन्यात अमेरिकेला रवाना होणार आहे. प्रणित पाटीलसह ६० जण या संशोधनाचा भाग असणार आहेत.
टप्प्याटप्प्याने चार जणांच्या पथकाने हे संशोधन केले जाणार आहे. मंगळावरील वातावरणात जुळवून घेण्यास अनुकूलता वाढविण्यासाठी हे संशोधन केले जात आहे. नासा हे या संशोधनाचा भाग असलेल्या पथकातील सदस्यांच्या तणाव व थकव्यावर नजर ठेवणार आहे.