प्रभागातील समस्या सोडविणाऱ्या उमेदवाराला पसंती
By admin | Published: May 9, 2017 01:31 AM2017-05-09T01:31:32+5:302017-05-09T01:31:32+5:30
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग १७ मध्ये मुख्य लढत भाजपा, शेकापक्ष व राष्ट्रवादीत होणार आहे. भाजपाने या मतदारसंघात
नितीन देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग १७ मध्ये मुख्य लढत भाजपा, शेकापक्ष व राष्ट्रवादीत होणार आहे. भाजपाने या मतदारसंघात दोन वकिलांना उमेदवारी दिली आहे. शेकापक्षाने अनुभवी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील व मीरा म्हात्रे या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांसोबत मैदानात उतरवले आहेत. सिडकोच्या ताब्यात असलेल्या या प्रभागात पाणी, कचरा, पार्किंग व रस्त्याची समस्या गंभीर आहे. या समस्या सोडवणाऱ्या उमेदवाराला मतदारांकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे.
प्रभाग १७ हा बहुतांश नवीन पनवेलमध्ये आहे. या प्रभागात २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २८,५१० आणि मतदारांची संख्या २८,७५० आहेत. याविरोधात अॅड. मनोज भुजबळ यांनी निवडणूक आयोगाकडे तक्र ार केली होती. सिडकोच्या हद्दीतील सेक्टर १२ ते १५ ए ,१७ ते १९, भुजबळ वाडी व पोदी अडीच हा भाग येतो. रेल्वे लाइनच्या पश्चिमेकडील एस.टी. स्टँडमागील लोकमान्य नगर, के. मॉलच्या मागच्या बाजूचा परिसर, तक्का व रेल्वे कॉलनी असा लांबवर पसरला आहे. यामध्ये पंचशील नगर, माल धक्का, लोकमान्य नगर, इंदिरा नगर व आझाद नगरचा भागही येतो. त्यामुळे या मतदार संघात मिश्र वस्ती आहे. या प्रभागात सिडको हद्दीत येणाऱ्या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर नाही. पण तक्का परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास मंजुरी मिळवली आहे. भुजबळ यांनी सिडकोच्या अधीक्षक अभियंत्यांना आणून वाहनतळासाठी नवीन जागा उपलब्ध करण्याबाबत पाहणी केली होती व विसपुते वसतिगृहाजवळ जागा उपलब्ध करून देण्यास मदत केली होती. भाजपाने प्रभाग १७ मध्ये सुशिक्षित मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी मनोज भुजबळ व वृषाली वाघमारे या वकिलांना संधी दिली आहे. या मतदार संघात असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळवून देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल, असे येथील नागरिकांना वाटते.