स्तनपानाविषयी जनजागृतीसाठी गर्भवतींना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:56 AM2019-07-30T01:56:18+5:302019-07-30T01:56:29+5:30

खारघरमध्ये शिबिर : तज्ज्ञ डॉक्टरांनी साधला संवाद; ५० जोडप्यांचा सहभाग

Pregnancy Guide for Breastfeeding Awareness | स्तनपानाविषयी जनजागृतीसाठी गर्भवतींना मार्गदर्शन

स्तनपानाविषयी जनजागृतीसाठी गर्भवतींना मार्गदर्शन

Next

पनवेल : गरोदरपणात स्त्रियांच्या मनातील प्रश्न, त्यांच्या समस्या, या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी तसेच स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खारघर येथील मदरहूड रुग्णालयाच्या वतीने रविवारी पनवेल येथे ‘लिटिल थिंग्स अबाउट प्रेग्नेन्सी’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात जवळपास ५० जोडप्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले.

आजकालच्या सुशिक्षित व उच्चभ्रू शहरी भागातील मातांच्या मनात नवजात शिशूला स्तनपान देताना गैरसमज असतात; परंतु स्तनपान दिल्याने बाळाला तर फायदा होतोच; पण स्तनदा मातेलाही खूप फायदे होतात. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी १ ते ७ आॅगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यानुषंगाने भावी आईबाबांना स्तनपानाविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरांतर्गत गर्भधारणेचे विविध पैलू, बाळंतपणा आणि पालकत्व अशा विविध विषयांवर चर्चात्मक संवाद साधण्यात आला. या वेळी आहारतज्ज्ञांकडून गर्भवती स्त्रियांना मार्गदर्शन करण्यात आले असून सकस आहार, फिटनेस, गरोदरपणातील फॅशन, लेबर मॅनेजमेंट आदी विषयांवरही संवाद साधण्यात आला.
शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अनु वीज, डॉ. सपना चौधरी, डॉ. सुरभी सिद्धार्थ, फेटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे, आहारतज्ज्ञ मानसी जानी, अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट डॉ. अनिता रॉय यांनी गर्भारपणातील विविध स्थितींची माहिती दिली.
आई होताना घ्यावयाची काळजी, बाळाची वाढ योग्यरीत्या होत आहे की नाही, याकरिता वेळोवेळी चाचणी, व्यायामाची जोड, पेनलेस डिलिव्हरी संबंधी समज गैरसमज, बाबा होताना येणारी महत्त्वाच्या जबाबदारी आदी विषयांवर भावी आईबाबांना मार्गदर्शन करण्यात आले.

गर्भारपणात स्त्री अनेक मानसिक व शारीरिक बदलातून जात असते. गर्भाच्या विविध अवयवांची वाढदेखील याच काळात होत असल्याने गरोदर स्त्रीने स्वत:ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. भावी आईला स्तनपानाविषयचे फायदे पटवून देण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश बिराजदार यांनी दिली.
 

Web Title: Pregnancy Guide for Breastfeeding Awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.