पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:37 AM2018-04-30T03:37:16+5:302018-04-30T03:37:16+5:30

पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री कोपरखैरणेत घडला आहे. या घटनेमधील जखमी व मारेकरू दोघेही आईस्क्रीमविक्रेते असून

Prehistoric attacks | पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला

पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला

googlenewsNext

नवी मुंबई : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री कोपरखैरणेत घडला आहे. या घटनेमधील जखमी व मारेकरू दोघेही आईस्क्रीमविक्रेते असून, नातलग असल्याचे समजते. या प्रकरणी रविवारी कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मोहम्मद हसन खान (१९), असे जखमी तरुणाचे नाव आहे, तो व त्याचा इतर एक नातेवाईक परिसरात पंजाब आणि महाराष्टÑ नावाने आईस्क्रीम विक्रीची गाडी चालवतात. पाच महिन्यांपूर्वीही त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याच वादातून शनिवारी रात्री कलश उद्यान परिसरात पुन्हा त्यांच्यात वाद झाला असता, एका गटाने लोखंडी रॉड व बॅटने मोहम्मद खान याला जबर मारहाण केली. या घटनेनंतर खान हा पोलीसठाण्यात गेला असता, पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात जायला सांगितले; परंतु तो वाशीतील पालिका रुग्णालयात गेला असता, डोक्यावर गंभीर दुखापत असल्याने तातडीने त्याला नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेप्रकरणी रविवारी दुपारपर्यंत कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे जखमी खान याच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कर्तव्याप्रति नाराजी व्यक्त केली होती. अखेर रविवारी संध्याकाळी कोपरखैरणे पोलिसांच्या तपास पथकाने डी. वाय. पाटील रुग्णालयात जाऊन खान याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. मात्र, जखमी खान हा मनपा ऐवजी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने त्याचा शोध घेऊन जबाब नोंदविण्यास उशीर झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांनी सांगितले. तसेच खान याच्यावर झालेला हल्ला पूर्ववैमनस्यातून झालेला असून, हल्लेखोरांना अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Prehistoric attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.