शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 3:37 AM

पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री कोपरखैरणेत घडला आहे. या घटनेमधील जखमी व मारेकरू दोघेही आईस्क्रीमविक्रेते असून

नवी मुंबई : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री कोपरखैरणेत घडला आहे. या घटनेमधील जखमी व मारेकरू दोघेही आईस्क्रीमविक्रेते असून, नातलग असल्याचे समजते. या प्रकरणी रविवारी कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.मोहम्मद हसन खान (१९), असे जखमी तरुणाचे नाव आहे, तो व त्याचा इतर एक नातेवाईक परिसरात पंजाब आणि महाराष्टÑ नावाने आईस्क्रीम विक्रीची गाडी चालवतात. पाच महिन्यांपूर्वीही त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याच वादातून शनिवारी रात्री कलश उद्यान परिसरात पुन्हा त्यांच्यात वाद झाला असता, एका गटाने लोखंडी रॉड व बॅटने मोहम्मद खान याला जबर मारहाण केली. या घटनेनंतर खान हा पोलीसठाण्यात गेला असता, पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात जायला सांगितले; परंतु तो वाशीतील पालिका रुग्णालयात गेला असता, डोक्यावर गंभीर दुखापत असल्याने तातडीने त्याला नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात हलवण्यात आले.या घटनेप्रकरणी रविवारी दुपारपर्यंत कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे जखमी खान याच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कर्तव्याप्रति नाराजी व्यक्त केली होती. अखेर रविवारी संध्याकाळी कोपरखैरणे पोलिसांच्या तपास पथकाने डी. वाय. पाटील रुग्णालयात जाऊन खान याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. मात्र, जखमी खान हा मनपा ऐवजी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने त्याचा शोध घेऊन जबाब नोंदविण्यास उशीर झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांनी सांगितले. तसेच खान याच्यावर झालेला हल्ला पूर्ववैमनस्यातून झालेला असून, हल्लेखोरांना अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.