विधानपरिषदेच्या तीनही मतदार संघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण
By कमलाकर कांबळे | Published: July 1, 2024 01:20 PM2024-07-01T13:20:03+5:302024-07-01T13:20:29+5:30
कोकण पदवीधर मतदार संघातील ३२१ केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी ८ फेऱ्यांमध्ये पूर्ण पूर्ण झाली आहे.
नवी मुंबई: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात २६ जून रोजी मतदान झाले. नवी मुंबईच्या नेरूळ येथील आगरी कोळी भवन मध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान तीनही मतदार संघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे.
कोकण पदवीधर मतदार संघातील ३२१ केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी ८ फेऱ्यांमध्ये पूर्ण पूर्ण झाली आहे. यात एकूण १ लाख ४३ हजार २९७ मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या आहेत. आता प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. यातून वैध व अवैध मतपत्रिकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण ४ फेऱ्या होतील. त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैध मतांचा कोटा ठरवला जाईल.
मुंबई पदवीधर
• एकूण ६७ हजार ६४४ मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली.
• मतपत्रिकांच वैध-अवैध तपासणी सुरु.
• त्यानंतर कोटा ठरेल.
मुंबई शिक्षक मतदारसंघ
• एकूण १२ हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली आहे.
• यातील ४०२ मतपत्रिका अवैध आढळल्या.
• ५८०० हा कोटा विजयी घोषित करण्यासाठी ठरविण्यात आला आहे.
• प्रत्यक्ष मतमोजणी सुरु झाली असून सुरुवातीस पहिल्या पसंतीची मते त्या त्या उमेदवारांना वाटप करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.