मयूर तांबडे पनवेल : गेल्या काही वर्षांमध्ये महावितरण कंपनीने प्रीपेड वीज मीटर ही संकल्पना पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, ठाणे, महाबळेश्वर, माथेरान अशा मोठ्या शहरांमध्ये सुरू केली होती. तेथे लोकप्रिय झालेली ही योजना रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात देखील राबविली. मात्र पनवेलमध्ये या प्रीपेड वीज मीटर योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही. पाच ते सहा वर्षांत पनवेल शहर व ग्रामीण भागात केवळ ३ हजार २१० मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये प्रीपेड वीज मीटर योजना संथ गतीने सुरू असल्याचे दिसत आहे.अंथरु ण पाहून पाय पसरावेत असा काटकसरीचा मूलमंत्र मोबाइल विश्वात जपताना प्रीपेड मोबाइल लोकप्रिय ठरला. याच ट्रॅकवरून जाताना महावितरणनेही प्रीपेड वीज मीटर ही संकल्पना काही ठिकाणी लोकप्रिय केली. ज्या ग्राहकांना आपल्या गरजेनुसार वीज वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. नेमका वीज वापर करताना काटकसर आणि बचत असा दुहेरी हेतू यात आहे. बिल भरण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही. शिवाय रिचार्ज करण्यापूर्वी सरकारी सुटीचा काळ ‘हॅपी अवर्स’ समजून रक्कम शिल्लक नसूनही वीज सुरूच राहील. ज्यांच्या घरी पूर्वीचे मीटर आहेत, त्यांना देखील प्रीपेड मीटर योजनेत सहभागी होता येते. त्यासाठी आधीच्या बिलाची प्रत, प्रीपेड मीटर मागणी अर्ज, शेवटच्या बिलाची बाकी, बिल भरल्याची पावती आदी कागदपत्रे सादर केली की घरी प्रीपेड मीटर बसविले जातात. त्यासाठी वेगळा काहीही खर्च करावा लागत नाही. काही ग्राहकांची घरे बरेच दिवस बंद असतात. त्यांच्या मीटरच्या रीडिंगचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी चालू रीडिंगऐवजी ‘लॉक’ असे नमूद करून अंदाजे बिल ग्राहकांच्या माथी मारले जाते. त्यासाठी प्रीपेड मीटर हा उत्तम पर्याय आहे. पनवेल परिसरात आतापर्यंत केवळ ३ हजार २१० प्रीपेड वीज मीटर लावण्यात आलेले आहेत.नियमित वीज ग्राहक देखील ‘प्रीपेड वीज मीटर’ बसवू शकतात. १०० रु पये शिल्लक राहिल्यानंतर हे उपकरण मीटर रिचार्ज करण्याची सूचना देते. या उपकरणाच्या वापरामुळे ग्राहक त्यांना हवी तेवढीच वीज वापरू शकतो. प्रीपेडसाठी भरलेल्या रकमेची वीज वापरण्यासाठी कालमर्यादेची अट नाही. रिचार्ज संपले तर राष्ट्रीय सण, सार्वजनिक सुटी, रात्रीच्यावेळी वीज पुरवठा खंडित केला जात नाही, हे या योजनेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र, कामकाजाच्या दिवशी रिचार्जची रक्कम ग्राहकाला त्वरित भरावी लागते. प्रीपेड मीटरमुळे वीज तसेच वेळेचीही बचत होते. महिन्याच्या प्रत्येक रविवारी, सार्वजनिक सुटी, प्रत्येक दुसºया-चौथ्या शनिवारी रिचार्ज संपले तरी वीज खंडित होणार नाही. पनवेल परिसरात मात्र या प्रीपेड वीज मीटरला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पनवेलमध्ये ही योजना संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.विजेची होते बचतज्या ग्राहकांना आपल्या गरजेनुसार वीज वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. नेमका वीज वापर करताना काटकसर आणि बचत असा दुहेरी हेतू यात आहे.रिचार्ज संपले तर राष्ट्रीय सण, सार्वजनिक सुटी, रात्रीच्यावेळी वीज पुरवठा खंडित केला जात नाही, हे या योजनेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र, कामकाजाच्या दिवशी रिचार्जची रक्कम ग्राहकाला त्वरित भरावी लागते.>प्रीपेड वीज मीटरमध्ये ग्राहक पहिलेच पैसे भरतो. त्यामुळे आम्हाला रीडिंग घेण्यासाठी अथवा वीज बिल देण्यासाठी ग्राहकांच्या घरी जावे लागत नाही. हे मीटर महागडे आहेत. त्यामुळे प्रीपेड वीज मीटर सध्या तरी सुरू होणार नाहीत.- माणिक राठोड,कार्यकारी अभियंता,महावितरण
प्रीपेड वीज मीटर योजना संथ गतीने,पाच ते सहा वर्षांत केवळ ३ हजार २१० मीटर बसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 2:18 AM