रायगडमध्ये जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:45 AM2017-07-24T06:45:08+5:302017-07-24T06:45:08+5:30

जुन्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेलमधील मुख्य कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जुन्या नोंदणीकृत खातेदारांचे रूपांतर तात्पुरत्या

Preparations for the GST implementation in Raigad | रायगडमध्ये जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी जय्यत तयारी

रायगडमध्ये जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी जय्यत तयारी

Next

पनवेल : जुन्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेलमधील मुख्य कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जुन्या नोंदणीकृत खातेदारांचे रूपांतर तात्पुरत्या जीएसटी क्र मांकाने जीएसटी खात्यात झाले आहे. या खात्यांचे स्थायी खात्यात रूपांतर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३० जुलै २०१७ ही अंतिम तारीख आहे.
सध्या रायगड जिल्ह्यासाठी प्रस्तावित तात्पुरत्या जीएसटी
क्र मांकाने ९४ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. जुने राज्य उत्पादन शुल्क खातेसुद्धा एसजीएसटीसाठी काम करीत असून, सध्या एसजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही खाती जीएसटीबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
देशात १ जुलैपासून जीएसटी करप्रणालीची सुरवात झाली आहे. पूर्वी साधारणपणे १६ टक्के उत्पादन शुल्क, १३ टक्के विक्र ीकर आणि आॅक्ट्रॉय ५.५ टक्के, म्हणजेच एकूण ३४.५टक्के इतका कर ज्या वस्तूंवर लागत होता त्यावर आता जास्तीतजास्त २८ टक्के इतका जीएसटी लागणार आहे. विशेष म्हणजे देशातील सेवांवर सारखाच कर तसेच वस्तूंवरही सारखाच कर लागणार आहे. त्याशिवाय कोणती वस्तू कोठे गेली याचे ट्रेसिंग होण्यासाठी नव्या रिटर्न प्रक्रि येत सुलभता येणार आहे. त्यामुळे काळाबाजार बंद होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जीएसटीला हिरवा कंदील दिलेला आहे. नागरिकांमध्येसुद्धा संभ्रम दूर व्हावेत यासाठी प्रशासन जनजागृती मोहीम घेत आहे. ज्या व्यापाऱ्याचे उत्पन्न वार्षिक २० लाखांपर्यंत आहे त्यांना जीएसटीची नोंदणी आवश्यक नाही. मात्र त्यांना तिमाही रिटर्न भरणे आवश्यक आहे. मासिक रिटर्नचे तीन प्रकार आहेत. महिन्याच्या १० तारखेला जीएसटीआर १ भरावा लागणार ज्यामध्ये एक्सपोर्ट, इम्पोर्ट, ट्रेडिंग, रिपेअरिंग अशा पुरवठ्याबाबतच्या आवक केलेल्या बाबी शासनाला दाखवाव्या लागतील. जीएसटीआर २ हा १५ तारखेला भरायचा आहे ज्यामध्ये जावक बाबी दाखवायच्या आहेत. त्यानंतर अंतर्गत मॅचिंग होऊन सिबिल रिपोर्ट तयार होणार आहे. जीएसटीआर ३ हा २० तारखेला भरायचा आहे. यासाठी रायगड आयुक्तालयअंतर्गत ६ विभाग कार्यरत आहेत.
नागरिकांना जीएसटीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हास्तरावर मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या या यंत्रणेमार्फत नागरिकांना जीएसटीबाबत जनजागृती केली जात असल्याची माहिती जीएसटीचे अधिकारी नारायण सोमैया यांनी दिली. कशापद्धतीने नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद आहे याचाही विचार या यंत्रणेमार्फत बघितला जात आहे.

जीएसटीच्या माहितीसाठी हेल्प डेस्क

पनवेलमधील व्यापाऱ्यांना जीएसटीबाबतच्या माहितीसाठी हेल्प डेस्क जुन्या आयकर भवन कार्यालयात, शेजारील ट्रायफेड टॉवरमध्ये उपलब्ध आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये टीएमएच्या कार्यालयातसुद्धा जीएसटी हेल्प डेस्क आहे.

Web Title: Preparations for the GST implementation in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.