शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
2
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
3
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
4
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
7
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
8
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
9
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
10
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
11
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
12
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
13
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा
15
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
16
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
17
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
18
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
19
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
20
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

रायगडमध्ये जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 6:45 AM

जुन्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेलमधील मुख्य कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जुन्या नोंदणीकृत खातेदारांचे रूपांतर तात्पुरत्या

पनवेल : जुन्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेलमधील मुख्य कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जुन्या नोंदणीकृत खातेदारांचे रूपांतर तात्पुरत्या जीएसटी क्र मांकाने जीएसटी खात्यात झाले आहे. या खात्यांचे स्थायी खात्यात रूपांतर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३० जुलै २०१७ ही अंतिम तारीख आहे.सध्या रायगड जिल्ह्यासाठी प्रस्तावित तात्पुरत्या जीएसटी क्र मांकाने ९४ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. जुने राज्य उत्पादन शुल्क खातेसुद्धा एसजीएसटीसाठी काम करीत असून, सध्या एसजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही खाती जीएसटीबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. देशात १ जुलैपासून जीएसटी करप्रणालीची सुरवात झाली आहे. पूर्वी साधारणपणे १६ टक्के उत्पादन शुल्क, १३ टक्के विक्र ीकर आणि आॅक्ट्रॉय ५.५ टक्के, म्हणजेच एकूण ३४.५टक्के इतका कर ज्या वस्तूंवर लागत होता त्यावर आता जास्तीतजास्त २८ टक्के इतका जीएसटी लागणार आहे. विशेष म्हणजे देशातील सेवांवर सारखाच कर तसेच वस्तूंवरही सारखाच कर लागणार आहे. त्याशिवाय कोणती वस्तू कोठे गेली याचे ट्रेसिंग होण्यासाठी नव्या रिटर्न प्रक्रि येत सुलभता येणार आहे. त्यामुळे काळाबाजार बंद होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जीएसटीला हिरवा कंदील दिलेला आहे. नागरिकांमध्येसुद्धा संभ्रम दूर व्हावेत यासाठी प्रशासन जनजागृती मोहीम घेत आहे. ज्या व्यापाऱ्याचे उत्पन्न वार्षिक २० लाखांपर्यंत आहे त्यांना जीएसटीची नोंदणी आवश्यक नाही. मात्र त्यांना तिमाही रिटर्न भरणे आवश्यक आहे. मासिक रिटर्नचे तीन प्रकार आहेत. महिन्याच्या १० तारखेला जीएसटीआर १ भरावा लागणार ज्यामध्ये एक्सपोर्ट, इम्पोर्ट, ट्रेडिंग, रिपेअरिंग अशा पुरवठ्याबाबतच्या आवक केलेल्या बाबी शासनाला दाखवाव्या लागतील. जीएसटीआर २ हा १५ तारखेला भरायचा आहे ज्यामध्ये जावक बाबी दाखवायच्या आहेत. त्यानंतर अंतर्गत मॅचिंग होऊन सिबिल रिपोर्ट तयार होणार आहे. जीएसटीआर ३ हा २० तारखेला भरायचा आहे. यासाठी रायगड आयुक्तालयअंतर्गत ६ विभाग कार्यरत आहेत. नागरिकांना जीएसटीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हास्तरावर मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या या यंत्रणेमार्फत नागरिकांना जीएसटीबाबत जनजागृती केली जात असल्याची माहिती जीएसटीचे अधिकारी नारायण सोमैया यांनी दिली. कशापद्धतीने नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद आहे याचाही विचार या यंत्रणेमार्फत बघितला जात आहे. जीएसटीच्या माहितीसाठी हेल्प डेस्कपनवेलमधील व्यापाऱ्यांना जीएसटीबाबतच्या माहितीसाठी हेल्प डेस्क जुन्या आयकर भवन कार्यालयात, शेजारील ट्रायफेड टॉवरमध्ये उपलब्ध आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये टीएमएच्या कार्यालयातसुद्धा जीएसटी हेल्प डेस्क आहे.