नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:48 AM2018-12-31T01:48:01+5:302018-12-31T01:48:14+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी उरण, पनवेलसह नवी मुंबईकरांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. हॉटेल्ससह, ३५० पेक्षा जास्त फार्महाउसमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले आहे.

 Preparations for New Year's Eve; Look at the policemen in the police | नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

Next

- वैभव गायकर

पनवेल : नववर्षाच्या स्वागतासाठी उरण, पनवेलसह नवी मुंबईकरांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. हॉटेल्ससह, ३५० पेक्षा जास्त फार्महाउसमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले आहे. पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रामध्ये कडक बंदोबस्त ठेवला असून, पार्ट्यांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे.
मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तीनही शहरांमधील हॉटेल्सच्या बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परिसरामधील वृक्षही रोषणाईने उजळत आहेत. मोठ्या रिसॉर्टमध्ये संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पनवेल व उरण परिसरामध्ये ३५० पेक्षा जास्त फार्महाउस असून, त्यामध्येही पार्ट्यांचे आयोजन केले आहे. ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी यापूर्वी खारघर हिल, प्रबळगड माची परिसर, गाढी नदी परिसरामध्येही मद्यपानाच्या पाट्या आयोजित केल्या जातात. पोलिसांनी या परिसरामध्ये जाण्यास बंदी घातली आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्येही रात्री कोणाला जाऊ दिले जाणार नाही. नवी मुंबईमध्ये मॉल संस्कृती वाढली आहे. प्रत्येक मॉलमध्ये ख्रिसमसपासूनच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्तही संगीत कार्यक्रम व इतर उपक्रम आयोजित करून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरात्रीच्या पार्ट्यांमुळे अनेक तरुण व्यसनांच्या जाळ्यात अडकत असतात. यामुळे काही सामाजिक संस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सहकुटुंबासह नवीन वर्षाचा जल्लोष करण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या मध्यरात्री ठाणे-बेलापूर रोड, सायन- पनवेल महामार्ग, पामबीच रोडवर चक्काजाम होत असते. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रमुख रोडवर बंदोबस्त वाढविला आहे. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हॉटेल्स, पबमध्ये साध्या वेशातील पोलीसही पाळत ठेवणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाºयांवर तत्काळ कडक कारवाइचे आदेश दिले आहेत. नागरिकांनीही मद्यपानाऐवजी सहकुटुंब नवीन वर्षाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालिका मुख्यालयास रोषणाई
१ जानेवारी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापनदिन असल्यामुळे पामबीच रोडवरही मुख्यालयाला आकर्षित रोषणाई करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी पाच हजारांपेक्षा जास्त नवी मुंबईकर नवीन वर्षाचे स्वागताठी मुख्यालयाबाहेर गर्दी करतात. यावर्षीही रोषणाईची तयारी केली आहे.

अखंड हरिनाम सप्ताह
नेरुळ सेक्टर-६ मध्ये त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबरला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. समाज व्यसनमुक्त राहावा व नवीन वर्षाचे स्वागत भगवंताच्या नामस्मरणाने करता यावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात असून नागरिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या वर्षी देहू गाथा मंदिरचे अध्यक्ष ह.भ.प. केशवमहाराज शिवणे, ह.भ.प. विठ्ठल महाराज साबळे, ह.भ.प. वैभव महाराज राक्षे यांचे कीर्तन होणार आहे. तसेच काल्याचे कीर्तन ह.भ.प. देवराम महाराज गायकवाड करणार आहेत. यानंतर महाप्रसादाचे आयोजनक केले आहे. बुधवारी सायंकाळी दिंडी सोहळा होणार आहे.

Web Title:  Preparations for New Year's Eve; Look at the policemen in the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस