पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तयारी, इस्कॉन मंदिराचे उद्या होणार लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 06:43 IST2025-01-14T05:53:40+5:302025-01-14T06:43:57+5:30
सध्या मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही चौकशी केली जात आहे. मंदिर परिसरात उभारलेल्या भव्य सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तयारी, इस्कॉन मंदिराचे उद्या होणार लोकार्पण
पनवेल : खारघर शहरातील भव्य इस्कॉन मंदिराचे १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहेत. इस्कॉनच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आठवडाभरापासून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या आगमनाच्या निमित्ताने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
सध्या मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही चौकशी केली जात आहे. मंदिर परिसरात उभारलेल्या भव्य सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. खारघरमधील कार्यक्रमात पंतप्रधान दीड ते दोन तास इस्कॉन मंदिर परिसरात असणार आहेत. यावेळी इस्कॉन मंदिराचीदेखील मोदी पाहणी करणार आहेत.
यामुळे इस्कॉन मंदिर परिसरातील इतर इमारतींवरही पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मोदींसह कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला निमंत्रितांनाच प्रवेश असणार आहे. याकरिता मंदिर प्रशासनाने पत्रिका वितरित केल्या आहेत.