कच-यापासून खतनिर्मिती, शंभर कंपोस्टिंग बिन्स बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:18 AM2018-01-19T01:18:51+5:302018-01-19T01:18:58+5:30

पनवेल महापालिका हद्दीतील कच-याचे वजन, क्षमता, घनता कमी करण्याकरिता प्रशासनाने वर्गीकरणावर भर दिला आहे. कच-याचे विघटन करण्यासाठी खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

To prepare fertilizer-based fertilizer, a hundred composting bins will be installed | कच-यापासून खतनिर्मिती, शंभर कंपोस्टिंग बिन्स बसविणार

कच-यापासून खतनिर्मिती, शंभर कंपोस्टिंग बिन्स बसविणार

Next

कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीतील कच-याचे वजन, क्षमता, घनता कमी करण्याकरिता प्रशासनाने वर्गीकरणावर भर दिला आहे. कच-याचे विघटन करण्यासाठी खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता एकूण शंभर कंपोस्टिंग बिन्स बांधण्यात येणार आहेत. याकरिता निविदा प्रक्रि या सुरू आहे. विशेष करून समाविष्ट गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर आणि समाविष्ट झालेल्या २९ महसुली गावांचा कचरा साडेचारशे टनावर गेला आहे. हा कचरा सिडकोच्या क्षेपणभूमीवर टाकण्यात येतो. भविष्यात कचरा टाकण्याकरिता जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे वाढीव कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सिडको वसाहतीतील कचºयाची सेवा महापालिकेकडे नाही, परंतु लवकर ते हस्तांतर होणार असल्याने मनपा प्रशासन तयारीला लागले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेलला हागणदारीमुक्त केले. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभाग नोंदवून महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनावर जोर दिला आहे.
कचºयाच्या वर्गीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही पुढाकार घेऊन कल्पतरू सोसायटीत झीरो गार्बेज करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. इतर नगरसेवकांनीही प्रबोधन सुरू केले आहे. कचरा वर्गीकरणाकरिता कचरा वेचक महिलांची मदत घेण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर पनवेल महापालिकेने खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता महत्त्वाच्या ठिकाणी खत कुंड्या बसविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कचºयावर प्रक्रि या करून खतनिर्मिती करण्यात येईल. त्या खताचा वापर उद्यान, गार्डन तसेच शहरातील झाडांकरिता करण्याचे नियोजन आहे. जास्त खत निर्माण झाले तर त्याची विक्र ी करून प्रशासनाला उत्पन्नसुद्धा मिळेल, असे मत आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: To prepare fertilizer-based fertilizer, a hundred composting bins will be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.