शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

कच-यापासून खतनिर्मिती, शंभर कंपोस्टिंग बिन्स बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:18 AM

पनवेल महापालिका हद्दीतील कच-याचे वजन, क्षमता, घनता कमी करण्याकरिता प्रशासनाने वर्गीकरणावर भर दिला आहे. कच-याचे विघटन करण्यासाठी खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीतील कच-याचे वजन, क्षमता, घनता कमी करण्याकरिता प्रशासनाने वर्गीकरणावर भर दिला आहे. कच-याचे विघटन करण्यासाठी खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता एकूण शंभर कंपोस्टिंग बिन्स बांधण्यात येणार आहेत. याकरिता निविदा प्रक्रि या सुरू आहे. विशेष करून समाविष्ट गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर आणि समाविष्ट झालेल्या २९ महसुली गावांचा कचरा साडेचारशे टनावर गेला आहे. हा कचरा सिडकोच्या क्षेपणभूमीवर टाकण्यात येतो. भविष्यात कचरा टाकण्याकरिता जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे वाढीव कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सिडको वसाहतीतील कचºयाची सेवा महापालिकेकडे नाही, परंतु लवकर ते हस्तांतर होणार असल्याने मनपा प्रशासन तयारीला लागले आहे.महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेलला हागणदारीमुक्त केले. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभाग नोंदवून महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनावर जोर दिला आहे.कचºयाच्या वर्गीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही पुढाकार घेऊन कल्पतरू सोसायटीत झीरो गार्बेज करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. इतर नगरसेवकांनीही प्रबोधन सुरू केले आहे. कचरा वर्गीकरणाकरिता कचरा वेचक महिलांची मदत घेण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर पनवेल महापालिकेने खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता महत्त्वाच्या ठिकाणी खत कुंड्या बसविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कचºयावर प्रक्रि या करून खतनिर्मिती करण्यात येईल. त्या खताचा वापर उद्यान, गार्डन तसेच शहरातील झाडांकरिता करण्याचे नियोजन आहे. जास्त खत निर्माण झाले तर त्याची विक्र ी करून प्रशासनाला उत्पन्नसुद्धा मिळेल, असे मत आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.