घनकचरा वर्गीकरणाचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण, नवी मुंबई पालिकेला मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 12:17 AM2020-07-05T00:17:51+5:302020-07-05T00:18:29+5:30

नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कचरा वर्गीकरण पद्धतीची सादरीकरणासह माहिती दिली.

Presentation of Solid Waste Classification at National Level, Navi Mumbai Municipality gets honor | घनकचरा वर्गीकरणाचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण, नवी मुंबई पालिकेला मिळाला मान

घनकचरा वर्गीकरणाचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण, नवी मुंबई पालिकेला मिळाला मान

Next

नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’चा प्रारंभ केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या वतीने नुकताच करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घनकचरा वर्गीकरणाविषयी सादरीकरण कार्यालयातून केले.
नवी दिल्लीमधील निर्माण भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘निर्मितीच्या स्थळी कचरा वर्गीकरण - घनकचरा व्यवस्थापनाची किल्ली’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित केले होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा वर्गीकरण कार्यप्रणालीचे राष्ट्रीय स्तरावर वेब सादरीकरण झााले. नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कचरा वर्गीकरण पद्धतीची सादरीकरणासह माहिती दिली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशात सातव्या व महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकाचे मानांकन लाभलेले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२०चा निकाल जाहीर होणे बाकी असून, या वर्षी जाहीर झालेल्या कचरामुक्त शहरांच्या श्रेणीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस ५ स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे.
असे रेटिंग प्राप्त करणाºया देशातील ६ शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. शहरात दररोज निर्माण होणाºया कचºयाचे ओला, सुका असे वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणीच होत असल्याबद्दलची, तसेच त्याचे संकलन, वाहतूक व शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली.

Web Title: Presentation of Solid Waste Classification at National Level, Navi Mumbai Municipality gets honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.