कल्याण : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ५६व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी कल्याण केंद्रावर ‘नाऱ्याचे वस्तरा हरण’ या नाटकाद्वारे सहावे पुष्प गुंफले गेले. कल्याण केंद्रावर १६ नोव्हेंबरला कल्याणमधील खान्देश हितसंग्राम संचालित जलरंग तापी नाट्य विभागाद्वारे आचार्य अत्रे नाट्यगृहात हा प्रयोग सादर करण्यात आला. देविदास हटकर लिखित आणि मनोहर खैरनार दिग्दर्शित या नाटकात जयेश गवाई, विशाल पंडित, प्रदीप ठाकूर, जान्हवी खान, प्रदीप सोनावणे, जगदीश पाटील, सुनील श्रीगिरी, अमिषा पवार, अंजली दुबे, रोशनी राजभर, वृषाली जाधव, भूषण पांडे, चेतन देठे, अजिंक्य बागडे, अमिषा पवार, संतोष शिंदे, सुभाष मुंडे, रेवती मागाडे, मृणाली गायकवाड, विशाल पंडित, सुविधा आडेलकर, विशाल शिरीषकर आदींनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. रंगभूषा चंदर पाटील, नेपथ्य पंकज तांबे यांचे होते. प्रकाशयोजना नितेश पाताडे यांनी केली तर संगीत धवल वाणी-अमर तावरे- शुभम गायकवाड- निखिलेश घोंगडे यांचे होते. (प्रतिनिधी)
कल्याणमध्ये ‘नाऱ्याचे वस्तराहरण’ सादर
By admin | Published: November 18, 2016 3:06 AM