- अरुणकुमार, मेहत्रे कळंबोलीआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्या, याकरिता सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पनवेल तालुका पोलिसांनी एका आरोपीला दोन वर्षांसाठी तडीपार केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, या उद्देशाने गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार, तालुका पोलिसांनी हरीग्राम येथील सचदेव नामदेव म्हात्रे (२४) याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोपीवर खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला रायगड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांच्याकडे सादर करण्यात आला असून, त्याला १ फेब्रुवारी रोजी मंजुरीही मिळाली आहे. त्यानुसार, म्हात्रेला दोन वर्षे तडीपार करण्यात आले आहे. सध्या रेकाँर्डवरील सक्रीय असलेल्या आरोपींची पडताळणी सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात येईल.- मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई
By admin | Published: February 05, 2017 2:53 AM