शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या नवी मुंबईकरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:53 PM

शहराच्या लौकिकामध्ये भर टाकणाºया कर्तृत्ववान नवी मुंबईकरांचा ‘लोकमत’च्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : शहराच्या लौकिकामध्ये भर टाकणाºया कर्तृत्ववान नवी मुंबईकरांचालोकमत’च्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. ‘सूर दिवाळीचे’ सांस्कृतिक कार्यक्रम व ‘नवी मुंबई अभिमान’ पुरस्कार सोहळ्याचे ३ नोव्हेंबरला आयोजन करण्यात आले आहे.देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक होऊ लागला आहे. राहण्यायोग्य शहरामध्येही या शहराचा देशात अग्रक्रमांक आहे. शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये अतुलनीय कामगिरी करणाºयांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत’ने ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण, आरोग्य जनजागृती, माहिती अधिकार, उद्योग, समाज प्रबोधन, मराठी साहित्य व संस्कृती, ग्रंथालय चळवळ, खेळांचा प्रचार व राजकीय क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाºयांना अभिमान नवी मुंबईचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शहराचा विकास फक्त पायाभूत सुविधांवर अवलंबून नसून, तो नागरिकांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानावर ठरत असतो. यामुळेच विविध क्षेत्रामध्ये आयुष्यभर त्यागी वृत्तीने काम करणाºयांचा या कार्यक्रमात गौरव होणार आहे.दिवाळीनिमित्त ‘सूर दिवाळीचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केला आहे. यामध्ये फराझ शहा यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. फराझ यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत. या वेळी नृत्य दिग्दर्शक श्यामा कुरवत यांच्या नृत्यालय आटर््स अ‍ॅण्ड कल्चरल वेल्फेअर असोसिएशनचे कलाकार समूहनृत्य सादर करणार आहेत. निशा गिलबर्ट यांच्या नुपूर स्कूल आॅफ डान्स संस्थेचे कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत. प्रसिद्ध गायिका अरुणा सेल्वराज ही उपस्थित राहणार असून, अरुणा यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त संगीत मैफीलमध्ये सहभाग घेतला आहे. आशिमिक कामठे यांच्या कमल आनंद ग्रुपचा ‘वारसा माझ्या कलेचा’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. याशिवाय ओंकार कोळपकर विनोदी नाट्य सादर करणार आहेत. प्रसिद्ध सिनेकलाकार संतोष जुवेकर, अभिनेत्री हेमांगी कवी, प्रसाद कांबळी, हेही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास आमदार मंदा म्हात्रे, पोलीस आयुक्त संजय कुमार व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश‘लोकमत’च्या वतीने ‘सूर दिवाळीचे’ व ‘नवी मुंबई अभिमान’ पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. दिवाळीनिमित्त शहरवासीयांसाठी सांस्कृतिक मेजवानी व शहराच्या जडणघडणीमध्ये अमूल्य योगदान देणाºया कर्तृत्ववान नागरिकांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, जास्तीत जास्त शहरवासीयांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.कार्यक्रमाचा तपशीलदिनांक : शनिवार, ३ नोव्हेंबर २०१८वेळ : सकाळी ११ वाजताठिकाण : विष्णुदास भावे नाट्यगृह

टॅग्स :Santosh Juvekarसंतोष जुवेकरHemangi Kaviहेमांगी कवीLokmatलोकमतNavi Mumbaiनवी मुंबई