दादरमध्ये रंगणार श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:28 AM2017-08-12T06:28:02+5:302017-08-12T06:28:02+5:30
उपवासाच्या एकापेक्षा एक हटके पदार्थांमुळे, श्रावण महोत्सवाच्या प्राथमिक फेºयांमध्ये रंगत आली. पारंपरिकतेची कास धरत, महिलांनी आधुनिकता स्वीकारून चवदार, रुचकर असे उपवासाचे पदार्थ तयार केले.
मुंबई : उपवासाच्या एकापेक्षा एक हटके पदार्थांमुळे, श्रावण महोत्सवाच्या प्राथमिक फेºयांमध्ये रंगत आली. पारंपरिकतेची कास धरत, महिलांनी आधुनिकता स्वीकारून चवदार, रुचकर असे उपवासाचे पदार्थ तयार केले. उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन प्रस्तुत हा श्रावण महोत्सव अंतिम टप्प्यात आला असून, १२ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता दादरमध्ये श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी रंगणार आहे. या श्रावण महोत्सवाचे ‘लोकमत सखी मंच’ माध्यम प्रायोजक आहेत.
‘उपवासाचा एक पदार्थ - पण जरा हटके’ असा प्राथमिक फेरीचा विषय असून, यात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, बटाट्याची भाजी असे नेहमीचे पदार्थ न करता, वेगळ्या फॉर्ममध्ये करावेत. स्पर्धेसाठी दिलेला पदार्थ महिलांनी घरून बनवून आणावा व त्याची मांडणी स्पर्धेच्या ठिकाणी करावी. एकूणच पदार्थाच्या चवीवर आणि सादरीकरणावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून राहील. महिलांनी सादरीकरणासाठी फुले, तोरण व पणती अशा गोष्टींचा वापर न करता खाद्यपदार्थच वापरावेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. मात्र, नावनोंदणी अत्यावश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम
मानला जाईल. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख असणार आहेत.
प्राथमिक फेरीतून प्रत्येक सेंटरमधून १० महिलांची निवड केली जाईल. या १० विजेत्या महिलांना ‘मदर्स रेसिपी’तर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स दिले जाईल.
शिवाय उपस्थित सर्व महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून तन्वी हर्बल्स, पितांबरी रुचियाना गूळ, फोंडाघाट फार्मसी, ज्योविज स्कीम क्लिनिक, साडीघर यांची आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स दिली जाणार आहेत.
श्रावण महोत्सवाच्या महाअंतिम सोहळ्याचे मुख्य परीक्षक दुबईतील मसाला किंग धनंजय दातार असणार आहेत. शिवाय, सहभाग घेणाºया प्रत्येक महिलेला भेटवस्तू मिळेल.
च्दिनांक - १२ आॅगस्ट २०१७
च्स्थळ - बाळासाहेब ठाकरे आय. ए. एस. अकादमी, मराठे उद्योगभवनाच्या मागे, प्रभादेवी.
च्वेळ - दुपारी १ वाजता
च्झोनल हेड - ज्योती भोसले : ९८६९९५८४३२