वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवस काँग्रेसच्या वतीने पनवेल येथे दि.17 रोजी बेरोजगारी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. पनवेल काँग्रेस भवन येथील रस्त्यावर राष्ट्रीय बेरोजगारी दिवस केक कापून व पकोडे तळून साजरा करण्यात आला.
पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला. मागील 8 वर्ष पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्या मध्ये नोटबंदी, अस्थिर जीएसटी, कोविड मध्ये लावलेले उशिरा लॉकडाउन अशा अनेक निर्णयांमुळे बेरोजगारी व महागाई वाढली आहे असा आरोप यावेळी कॉग्रेसने केला.यावेळी युवक काँग्रेस सचिव विश्वजीत पाटील, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नौफील सय्यद व युवक काँग्रेसचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत मुंडक्कल,पंडित भोपी, प्रितेश साहू, राहुल सावंत, महासचिव अलका ठाकूर , प्रमोद पवार, अम्मार मदार, शहीद मुल्ला, नवीन पनवेल शहराध्यक्ष मर्फी म्हसकर, पनवेल शहर अध्यक्ष राकेश जाधव, तलोजा फेज 1 अध्यक्ष मोरेश्वर पाटील, व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.