अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली - शिवडी न्हावाशेवा सागरी शेतीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. मुंबई ते पनवेल या दरम्यान त्यांनी वाहनांनी प्रवास केला. पंतप्रधानांचे आम्रमार्गावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. भागात राहणाऱ्या विविध प्रांतातील नागरिकांनी आपल्या संस्कृतीचे जतन आणि दर्शन घडवत मोदी यांचे स्वागत केले. त्यामध्ये बँड, ढोल ताशा, झांज, भांगडा, गरबा सादर करून नवचैतन्य निर्माण करण्यात आले.
शिवडी न्हावा शेवा या अटल सागरी सेतूचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पनवेल या ठिकाणी शुक्रवारी आले होते. देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मुंबईहून बाय रोड वीस मिनिटांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेला कार्यक्रम स्थळी पोहोचले. उलवे वसाहतीच्या प्रवेशद्वारापासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर आम्र मार्गाच्या सर्विस रोडवर विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. या ठिकाणी राजस्थानी रहिवासी मंडळाच्या वतीने पंतप्रधानांच्या गाडीवर पुष्पृष्टी करण्यात आले. त्याचबरोबर गुजराती समाजाच्या वतीने रास दांडिया हे पारंपरिक नृत्य करून मोदी यांचे लक्ष घेतले.
त्याचबरोबर दक्षिणेतील राज्यात पनवेल परिसरातील रहिवाशांनी सुद्धा आपले संस्कृतीचे नवी मुंबईमध्ये दर्शन घडविले. या भागातील आदिवासी कलाकारांनी आपले पारंपरिक नृत्य करून पंतप्रधानांचे स्वागत केले. मावळ येथील ढोल ताशा ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पनवेल मधील बँड पथकाने विविध गाण्यांवर धुन वाजवली. उपस्थितांनी ठेका धरत एकच जल्लोष केला. त्याचबरोबर मोदींच्या स्वागतासाठी खास आळंदी येथून बालवालकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. टाळ मृदंगाच्या तालावर राम कृष्ण हरी चा जय जय कार यावेळी करण्यात आला.
मोदी ....मोदी चा नारासी लिंक त्यानंतर जेएनपीटी हायवे आणि येथून आम्र मार्गावर प्रवेश केल्यानंतर मोदी.. मोदी एकच नारा उपस्थितांनी दिला. फुलांची उधळण करत पनवेल आणि नवी मुंबईकरांनी देशाच्या पंतप्रधानांचे स्वागत केले.
जय श्रीराम चा जयघोष!अयोध्या मध्ये लवकरच राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचे काउंटडाऊन सध्या सुरू आहे. संपूर्ण देशाला या क्षणाचे वेध लागले आहेत. त्या अगोदर काही दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यक्रमानिमित्त आले. त्यामुळे राम भक्ताने या परिसरामध्ये जय श्री रामाचा घोष केला.