बनावट तंबाखू उत्पादन कारखान्यांवर छापा

By admin | Published: July 11, 2015 03:44 AM2015-07-11T03:44:50+5:302015-07-11T03:44:50+5:30

बनावट तंबाखूचे उत्पादन करून शहरात त्याची विक्री करणाऱ्या दोन कारखान्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून

Print on fake tobacco production factories | बनावट तंबाखू उत्पादन कारखान्यांवर छापा

बनावट तंबाखू उत्पादन कारखान्यांवर छापा

Next

नवी मुंबई : बनावट तंबाखूचे उत्पादन करून शहरात त्याची विक्री करणाऱ्या दोन कारखान्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पानटपरी चालकांसोबत संगनमत करून त्यांनी हा कारखाना सुरू ठेवला होता.
नेरूळ सेक्टर २० येथे वेगवेगळ्या प्रकारचा बनावट तंबाखू बनवला जात असल्याची माहिती परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रोहन बगाडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी रात्री दोन ठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथे भोलाछाप, रत्ना ३००, सागर, बाबा १२० अशा अनेक प्रकारच्या तंबाखूचे बनावट उत्पादन होत असल्याचे आढळले. याप्रकरणी अबू अहमद खान (२३), जाफर शफी खान (२०) व मोहम्मद शेख (३३) यांना अटक केल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. कारवाईत ७८ हजार २९० रुपयांची रोख रक्कम व ६३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भेसळ करून बनवलेला तंबाखू भरण्यासाठी विविध कंपन्यांचे नाव असलेले एक हजार रिकामे डबे देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. तिघांवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तंबाखूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची घातक रसायने मिसळून वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा बनावट तंबाखू तयार केला जायचा. हा तंबाखू बंद डब्यात भरून शहरातील अनेक पानटपऱ्यांवर विकला जात होता. १२० ते १५० रुपये किमतीऐवजी अवघ्या २५ ते ३० रुपयांना त्याची विक्री होत होती. जादा नफ्याची लालुच दाखवून शहरातील अनेक टपरी चालकांना त्यांनी आपले नियमित ग्राहक बनवले होते. त्यानुसार हे टपरीचालकच त्यांना रिकामे डबे देखील पुरवत होते. मूळ कंपनीच्या डब्यातील तंबाखू संपल्यानंतर ते २ ते ३ रुपयांना त्यांना विकला जायचे. रिकाम्या डब्यांचा पुन्हा वापर व्हावा याकरिता तो खालच्या बाजूने फोडला जायचा. डब्याच्या त्याच भागातून पुन्हा त्यात भेसळयुक्त तंबाखू भरल्यानंतर मशिनद्वारे तो भाग सीलबंद केला जायचा. हे मशिन नळबाजार येथून खरेदी केल्याचे मोहम्मद शेख याने पोलिसांना सांगितले. तर पनवेल येथे एका ठिकाणी तो काम करत असताना हा अवैध धंदा त्याला सुचल्याचीही कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

Web Title: Print on fake tobacco production factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.