शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

बनावट तंबाखू उत्पादन कारखान्यांवर छापा

By admin | Published: July 11, 2015 3:44 AM

बनावट तंबाखूचे उत्पादन करून शहरात त्याची विक्री करणाऱ्या दोन कारखान्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून

नवी मुंबई : बनावट तंबाखूचे उत्पादन करून शहरात त्याची विक्री करणाऱ्या दोन कारखान्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पानटपरी चालकांसोबत संगनमत करून त्यांनी हा कारखाना सुरू ठेवला होता.नेरूळ सेक्टर २० येथे वेगवेगळ्या प्रकारचा बनावट तंबाखू बनवला जात असल्याची माहिती परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रोहन बगाडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी रात्री दोन ठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथे भोलाछाप, रत्ना ३००, सागर, बाबा १२० अशा अनेक प्रकारच्या तंबाखूचे बनावट उत्पादन होत असल्याचे आढळले. याप्रकरणी अबू अहमद खान (२३), जाफर शफी खान (२०) व मोहम्मद शेख (३३) यांना अटक केल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. कारवाईत ७८ हजार २९० रुपयांची रोख रक्कम व ६३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भेसळ करून बनवलेला तंबाखू भरण्यासाठी विविध कंपन्यांचे नाव असलेले एक हजार रिकामे डबे देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. तिघांवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तंबाखूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची घातक रसायने मिसळून वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा बनावट तंबाखू तयार केला जायचा. हा तंबाखू बंद डब्यात भरून शहरातील अनेक पानटपऱ्यांवर विकला जात होता. १२० ते १५० रुपये किमतीऐवजी अवघ्या २५ ते ३० रुपयांना त्याची विक्री होत होती. जादा नफ्याची लालुच दाखवून शहरातील अनेक टपरी चालकांना त्यांनी आपले नियमित ग्राहक बनवले होते. त्यानुसार हे टपरीचालकच त्यांना रिकामे डबे देखील पुरवत होते. मूळ कंपनीच्या डब्यातील तंबाखू संपल्यानंतर ते २ ते ३ रुपयांना त्यांना विकला जायचे. रिकाम्या डब्यांचा पुन्हा वापर व्हावा याकरिता तो खालच्या बाजूने फोडला जायचा. डब्याच्या त्याच भागातून पुन्हा त्यात भेसळयुक्त तंबाखू भरल्यानंतर मशिनद्वारे तो भाग सीलबंद केला जायचा. हे मशिन नळबाजार येथून खरेदी केल्याचे मोहम्मद शेख याने पोलिसांना सांगितले. तर पनवेल येथे एका ठिकाणी तो काम करत असताना हा अवैध धंदा त्याला सुचल्याचीही कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.