मसाज पार्लरवर छापा
By admin | Published: June 11, 2017 03:21 AM2017-06-11T03:21:56+5:302017-06-11T03:21:56+5:30
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. यामधील मुख्य सूत्रधार हा कोपरखैरणेचा राहणारा असून खारघरमध्ये
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. यामधील मुख्य सूत्रधार हा कोपरखैरणेचा राहणारा असून खारघरमध्ये तो मसाज पार्लर चालवत होता. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
खारघर सेक्टर-३ येथील गॅलक्सी स्पा अॅण्ड सलून नावाच्या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता. या वेळी त्यांनी सदर पार्लरमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, त्या ठिकाणच्या मॅनेजरने वेश्याव्यवसायासाठी महिला उपलब्ध करून दिली. तसेच ग्राहकाकडून पैसे स्वीकारत असतानाच महिला पोलीस निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार सापते, शितोळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.
छाप्यामध्ये त्या ठिकाणच्या तीन महिलांची सुटका करून शिवकुमार चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. तसेच मसाज पार्लर चालक कुमार वसंतराव गोळे यालाही अटक केली आहे. कुमार गोळे याने पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू केला होता. गोळे हा कोपरखैरणे सेक्टर-१५मधील राहणारा असून, गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश मंडपात जुगाराचा अड्डा चालवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.