शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

शाळांमधील खासगी परीक्षांवर बंदी

By admin | Published: February 09, 2017 4:54 AM

शालेय विद्यार्थ्यांचा हसत-खेळत आनंददायी शिक्षण पद्धतीने अध्ययन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अवांतर, खासगी व नियमबाह्य असणाऱ्या

अरु णकुमार मेहत्रे , कळंबोलीशालेय विद्यार्थ्यांचा हसत-खेळत आनंददायी शिक्षण पद्धतीने अध्ययन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अवांतर, खासगी व नियमबाह्य असणाऱ्या स्पर्धा परीक्षांवर आता बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसे परिपत्रक काढून सर्व शाळांना आदेश दिले आहेत.प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा अध्ययन विकास साधण्यासाठी शाळांमध्ये विविध परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखती, निरीक्षणपद्धती असे विद्यार्थ्यांचे अध्ययन कौशल्य ओळखण्यासाठी अनेक निकष शिक्षक वापरतात. यातच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे हे एक शासनासमोर आव्हान आहे, असे असले तरी विद्यार्थ्यांना कायम शिक्षणपद्धतीत पाठ्यपुस्तक व अभ्यासक्र मा व्यतिरिक्त इतर अवांतर परीक्षेचा ताण येत असल्याचे शासनाच्या लक्षात आले. विविध खासगी संस्थांमार्फत प्रज्ञाशोध घेण्याच्या नावाखाली परीक्षा घेतल्या जातात. पालक आणि काहीवेळा शाळा मुलांना अशा परीक्षांना बसायला लावतात. याचा विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता असते. या अवांतर खासगी परीक्षांसाठी लागणारी फीसुद्धा बऱ्याच पालकांना परवडणारी नसते. पालकांच्या खिशाला कात्री लागण्याची वेळ येते. रोजच्या शिक्षण पद्धतीचा विचार करता आनंददायी शिक्षण पद्धती कायम राहावी व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पद्धतीचा ताण निर्माण होऊ नये यासाठी खासगी तसेच नियमबाह्य स्वरूपाच्या शिक्षणपद्धतीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.