शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

खासगी शाळांचे  ‘पैशासाठी कायपण’ धोरण; शिशू वर्गाच्या ऑनलाइन शिक्षणातही गणवेशाची सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:33 PM

शिक्षण विभागाचे मौन : यंदा प्रथमच एकाच शाळेत वरच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ५०० ते १००० रुपये फॉर्म शुल्क आकारले जात आहेत. 

नवी मुंबई : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून प्रत्यक्षात शाळांची घंटा वाजली नाही. यामुळे शुल्काव्यतिरिक्त कमाईचे मार्ग बंद झाल्याने शाळांनीऑनलाइनशिक्षणात गणवेश सक्तीचा केला आहे. त्यासाठी पालकांकडून ३ ते ५ हजार रुपये उकळले जात आहेत. यानंतरही शाळांच्या मनमानी कारभाराबाबत शिक्षण विभाग हात आखडता घेत आहे. 

शहरात सीबीएससी, आयसीएससी बोर्डाच्या शाळांवर पालिकेचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. शिशू वर्ग व प्राथमिक वर्गासाठीदेखील ऑनलाइन शाळा भरवून लाखो शुल्क आकारले जात आहे. अनेक पालकांना हेच शुल्क डोईजड झालेले असतानाच शाळांनी वेगवेगळ्या मार्गाने पालकांची आर्थिक पिळवणूक चालवली आहे. त्याकरिता यंदाच्या शुल्कात गणवेश शुल्काची भर टाकली आहे. प्राथमिक वर्गांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही शाळेचाच गणवेश घालायचा अशी सक्ती आहे. मात्र, आठवड्यातून तीन दिवस भरणाऱ्या ऑनलाइन वर्गासाठी गणवेशाची सक्ती का, असा प्रश्न पालकांना पडला आहे. या गणवेशासाठी ३ ते ५ हजार रुपये आकारले जात असून, त्यात पिटीच्या गणवेशाचाही समावेश आहे,  तर यंदा प्रथमच एकाच शाळेत वरच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ५०० ते १००० रुपये फॉर्म शुल्क आकारले जात आहेत. 

कारवाई होत नसल्याची खंत एखाद्या पालकाने याविरोधात आवाज उठविल्यास त्यांना इतरत्र प्रवेश घेण्याचा धमकीवजा इशारा दिला जात आहे. त्यामुळे पालकांची गळचेपी होत आहे; परंतु शहरातील बहुतांश खासगी शाळांमध्ये पालकांची आर्थिक पिळवणूक सुरू असतानाही शिक्षण विभाग ठोस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेतील एका अधिकाऱ्याची अनेक वर्षांपासून कॉन्व्हेंट शाळांवर कृपादृष्टी असल्याा आरोप होत आहेत. त्यामुळे मनमानी करणाऱ्या शाळांविरोधात पालकांनी आवाज उठवूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणSchoolशाळा