शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 11:59 PM2019-04-15T23:59:04+5:302019-04-15T23:59:10+5:30
कच-याचे वर्गीकरण न करणाºया गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.
नवी मुंबई : कच-याचे वर्गीकरण न करणाºया गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. यामुळे अनेक सोसायट्यांमधील कचरा सार्वजनिक कचरा कुंडीमध्ये टाकला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग तयार झाले असून दुर्गंधीही पसरू लागली आहे.
स्वच्छता अभियानामध्ये देशात नावलौकिक टिकविणाºया नवी मुंबई महापालिकेसमोर हे स्थान टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अभियान संपताच नागरिकांकडून कचरा वर्गीकरणही बंद झाले आहे. ओला व सुका कचरा एकाच डब्यात टाकला जात आहे. कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. वर्गीकरण न करणाºया सोसायट्यांमधील कचरा उचलणे बंद केले आहे. यामुळे अनेक सोसायट्यांमधील कचरा रोडवरील कचरा कुंडीमध्ये टाकला जात आहे. रोडवर अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग तयार झालेले चित्र दिसत आहे.
सोमवारी तुर्भेमधील जनता मार्केटमधील कचरा सायंकाळपर्यंत उचलण्यात आला नव्हता. सानपाडामधील चिराग हॉटेल व वाशीकडील टोकाजवळील कचरा कुंडी भरून रोडवर कचरा पडला आहे. दिवसभर कचरा उचलण्यात आला नाही. यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती. नेरूळ, वाशी परिसरामध्येही काही ठिकाणी कचरा सायंकाळपर्यंत तसाच असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.