प्रभागातील प्रश्न सुटण्याऐवजी वाढले

By admin | Published: May 4, 2017 06:16 AM2017-05-04T06:16:16+5:302017-05-04T06:16:16+5:30

पूर्वी पनवेल नगरपालिकेच्या हद्दीत असलेले प्रभाग क्र मांक १५, १६ आणि १७मध्ये रस्ते, पाणी, वीज, मैदान, बाजारपेठ, पार्किंग

The problems in the area increased rather than settled | प्रभागातील प्रश्न सुटण्याऐवजी वाढले

प्रभागातील प्रश्न सुटण्याऐवजी वाढले

Next

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोली
पूर्वी पनवेल नगरपालिकेच्या हद्दीत असलेले प्रभाग क्र मांक १५, १६ आणि १७मध्ये रस्ते, पाणी, वीज, मैदान, बाजारपेठ, पार्किंग, सार्वजनिक शौचालय यांसारख्या पायाभूत सुविधांचा बोजवारा सातत्याने उडत आहे. सिडको प्राधिकरणाकडून सातत्याने दुर्लक्ष केले असल्याने दिवसेंदिवस प्रश्न सुटण्याऐवजी वाढत गेले. यामुळे येथील नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. सिडकोकडून काही नगरसेवकांनी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
प्रभाग क्र मांक१५मध्ये खांदा वसाहतीचा समावेश आहे. नवीन पनवेलचा पश्चिम भाग म्हणजे खांदा वसाहत. सिडकोने सेक्टर १, ८, ९, १३, १४ या भागात सर्वसामान्यांसाठी घरे बांधली. त्यानंतर खासगी बांधकाम व्यावसायिकांनी सिडकोच्या भूखंडावर टोलेजंग इमारती बांधून पैसे कमविले. मात्र, सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यास सिडको अपयशी ठरली. सिडकोने बांधलेल्या सेक्टर ८ येथील ए व बी टाइपच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून रहिवासी जीव मुठीत धरून राहात आहेत. त्यावर सिडको कोणताही ठोस निर्णय घेत नाही.
शिवाजी चौक परिसरात रस्त्यावर अस्ताव्यस्त केलेली पार्किंग वाहतूककोंडीला निमंत्रण देत आहे. चौकात वाहतूक बेट नसल्याने चारही बाजूने येणारी वाहने वेगात येतात आणि वारंवार अपघात घडतात. खांदेश्वर रेल्वेस्थानकाकडून येणारे शेअर रिक्षा मनमानी पद्धतीने रस्त्यावर उभ्या राहतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेला चौकाचा श्वास गुदमरतो. मुख्य रस्त्यावर बेकादेशीररीत्या वाहने पार्किंग केली जातात, त्यामुळे तिथे सम-विषम पार्किंगची आवश्यकता आहे.
नवीन पनवेल नोडमध्ये ना स्वच्छतागृह आहे, ना समाजमंदिर त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली. आता स्वच्छतागृह बांधण्यात आले; परंतु त्याचा वापर सुरू झालेला नाही. खांदा वसाहतीत सेक्टर १२, ५, ४ येथे उद्यानासाठी भूखंड राखीव आहे. सिडकोने कित्येक वर्षे हे भूखंड विकसित केले नाहीत. नेरे रोडच्या अलीकडील भागात प्रभाग क्र मांक १६ची निर्मिती झालेली आहे. मध्यमवर्गीयांची संख्या येथे सर्वात जास्त आहे. या ठिकाणीही
रस्ते, उद्यानांचा अभाव आहे.
आदई तलावाचे सुशोभीकरण झालेले नाही. राजीव गांधी मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम उभारण्याचे काम कागदावरच आहे. घनकचऱ्याचा प्रश्न या प्रभागातही डोके वर काढून आहे.
नेरे रोडपासून ते पनवेल रेल्वेस्थानक परिसर त्याचबरोबर तक्का गावालगतच्या झोपडपट्ट्यांचा १७ क्र मांकाच्या प्रभागात समावेश होतो. येथील उद्यानासाठी राखीव असलेला भूखंड एका शिक्षण संस्थेला देण्याचा घाट सिडकोने घातला होता; परंतु दोन तत्कालीन स्थानिक नगरसेवकांनी कडाडून विरोध करीत लढा उभारला. त्यामुळे नवीन पनवेलकरांसाठी सर्वात मोठे उद्यान उभारले.
होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. त्यामुळे हा ‘ग्रीनवॉर्ड’ म्हणून ओळखला जाणार आहे. झोपडपट्टीचा भाग मोठा असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आहे.

मैदानांची वानवा
तीनही प्रभागात जी मैदाने आहेत, ती शाळेच्या बाजूला आहेत. त्यावर शैक्षणिक संस्थांनी कब्जा केला आहे. नियमानुसार ही मैदाने शाळा सुटल्यानंतर सर्वांसाठी खुली करणे क्र मप्राप्त असताना ती बंद कुलुपाच्या आत आहेत. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदानाचा वानवा आहे.

Web Title: The problems in the area increased rather than settled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.