कर्जत रेल्वे स्थानकात समस्या

By admin | Published: March 28, 2017 05:29 AM2017-03-28T05:29:39+5:302017-03-28T05:29:39+5:30

कर्जत रेल्वे स्थानकातील समस्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास, तसेच प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत कर्जत आरपीआय

Problems at Karjat railway station | कर्जत रेल्वे स्थानकात समस्या

कर्जत रेल्वे स्थानकात समस्या

Next

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकातील समस्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास, तसेच प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत कर्जत आरपीआय महिला आघाडीच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची एक प्रत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना देण्यात आली.
केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे रायगडमध्ये आले होते त्या वेळी कर्जत शहर आरपीआय महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली भोसले, तालुका अध्यक्षा अलका सोनावणे, कर्जत शहर उपाध्यक्षा उज्ज्वला सोनावणे, युवा सचिव किशोर जाधव, तालुका सचिव मनोज गायकवाड, संतोष जाधव यांनी भेट घेऊन निवेदनाची प्रत त्यांना दिली.
या निवेदनात कर्जत-पनवेल रेल्वे लाइन टाकण्यात आली आहे, मात्र कर्जत -पनवेल प्रवाशांना त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे या लाइनवर मेमू किंवा डी. एम. यू. सेवा चालू करावी, कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट दोनवरील बाथरूम, शौचालय लहान आहे ते मोठे करावे, सकाळी सव्वादहा वाजता पुण्याला जाणारी कोयना गाडी आहे, मात्र त्यानंतर पुण्याला जाण्यासाठी दुपारी दोन वाजता गाडी या मधल्या वेळेत गाडी नाही ती चालू करावी, तसेच पुण्याहून कर्जतला संध्याकाळी सहा वाजता कोयना एक्स्प्रेस येते त्यानंतर रात्री सव्वा आठ वाजता इंद्रायणी एक्स्प्रेस येते. मात्र या दोन गाड्यांमध्ये कर्जतला यायला गाडी नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.
पुण्याहून इंटरसिटी एक्स्प्रेस व उद्यान एक्स्प्रेसला मुंबईला जाताना त्यांना कर्जतला थांबा द्यावा या गैरसोयीची दखल घ्यावी आदी विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना देऊन नागरिक आणि प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्याची विनंती कर्जत तालुका आरपीआयच्यावतीने करण्यात आली. (वार्ताहर)
गेट आवश्यक
गुंडगे येथील रहिवाशांना कर्जत मार्केटमध्ये येण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागतो त्यासाठी वाहन लागते. तरी रेल्वेने कर्जत रेल्वे स्थानकाच्या पुणे एन्डकडे किलोमीटर ९९/४२-४५ मध्ये गेटची व्यवस्था करावी त्यामुळे गुंडगे येथील रहिवाशांंचा वेळ आणि पैशाची बचत होईल असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Problems at Karjat railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.