शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खोपोलीत वाहतूककोंडीची समस्या

By admin | Published: March 29, 2017 5:02 AM

खोपोलीतील वाहतूककोंडीबाबत आजवर वेळोवेळी होणाऱ्या शांतता समितीच्या बैठका, तसेच नगरपालिका सर्वसाधारण

वावोशी : खोपोलीतील वाहतूककोंडीबाबत आजवर वेळोवेळी होणाऱ्या शांतता समितीच्या बैठका, तसेच नगरपालिका सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा घडली आहे. याबाबतीत तात्पुरते उपाय करून नगरपालिका व पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. खोपोली बाजारपेठ, स्टेशन रोड, समाज मंदिर रोड, शास्त्रीनगर, शिळफाटा एसटी डेपो ते इंदिरा गांधी चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनत असल्याने या ठिकाणी नागरिकांना चालणेही कठीण बनले आहे.अतिक्रमण, फेरीवाले व अनधिकृत वाहने पार्किंगमुळे खोपोलीतील प्रमुख ठिकाणी वाहतुकीचा श्वास कोंडला आहे. दिवसेंदिवस चारचाकी व दुचाकींची संख्या वाढत असल्याने शहरात वाहतूक समस्या सर्वात मोठी समस्या बनली आहे. खोपोलीतील वाहतूक समस्या बिकट होण्यामागे नियमबाह्य वाहने पार्किंग व वाढलेली वाहन संख्या ही प्रमुख कारणे असल्याचे पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र या समस्येचे मूळ म्हणजे बांधकामांना दिलेली परवानगी, इमारतीच्या पार्किंगच्या जागेतील अनधिकृत गाळे, रस्त्यांवर आलेली अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांवर नसलेले नियंत्रण व खराब रस्ते ही प्रमुख कारणे वाहतूककोंडीला जबाबदार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. खोपोली बाजारपेठेतील अनेक इमारतीत पार्किंगच्या जागेत अनधिकृत गाळे निर्माण के ल्याने पार्किंगसाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे इमारतीमधील रहिवासी तसेच बाजारपेठेत दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावर आल्याने वाहने चालविण्यासाठी रस्ता अपुरा पडत असल्याने येथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. प्रत्येक शांतता समितीच्या बैठकीत व नगरपालिका सभेत वाहतूककोंडीबाबत चर्चा रंगते. त्यानंतर प्रशासन काही दिवसांसाठी कडक अंमलबजावणी करून लोकभावनेचा आदर केल्याचे दाखवते. मात्र काही दिवसांत पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे समस्या जैसे थे असते. खोपोलीतील नागरिकांना वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नियमित वाहतूक पोलिसांशिवाय अतिरिक्त तीन पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. सम, विषम नियमानुसार, वाहने पार्किंगचा नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलीस प्रशासन पूर्ण क्षमता वापरून काम करीत आहे, मात्र समस्या कमी करण्यासाठी खोपोली नगरपालिका व नागरिकांच्या ठोस सहकाऱ्याची गरज आहे.-एस.एम.शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षकखोपोलीत वाहतूक समस्या बिकट होण्यामागे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. फेरीवाले, अतिक्र मणे रोखणे, बाजारपेठ व इतर वाहतूक समस्यांच्या ठिकाणी व्यापारी तसेच रहिवासी इमारतींना स्वत:ची पार्किंग व्यवस्था असणे या बाबी कायम राखण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र खोपोली नगरपालिका प्रशासन आर्थिक हितसंबंध असल्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.- विजया देवरे - पाटील, सामाजिक कार्यकर्त्या