भाजी मार्केटला समस्यांचा विळखा, महापालिकेसह एपीएमसीचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:01 AM2019-05-30T00:01:53+5:302019-05-30T00:02:08+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केट परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे.

 Problems with the vegetable market, the absence of the APMC with the corporation | भाजी मार्केटला समस्यांचा विळखा, महापालिकेसह एपीएमसीचे दुर्लक्ष

भाजी मार्केटला समस्यांचा विळखा, महापालिकेसह एपीएमसीचे दुर्लक्ष

googlenewsNext

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केट परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. मुख्य मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये रोडवरच कांदा-बटाट्याचा अवैधपणे व्यापार सुरू आहे. रोडवर कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यास सुरुवात झाली असून या समस्येकडे महापालिकेसह एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
एपीएमसीमधील सर्वाधिक समस्या भाजी व फळ मार्केट परिसरामध्ये आहेत. मुख्य व विस्तारित भाजी मार्केटला जोडण्यासाठी रोड तयार करण्यात आला आहे. या रोडचा वाहतुकीऐवजी अनधिकृत व्यापारासाठी वापर केला जात आहे. याठिकाणी अनधिकृतपणे कांदा व बटाट्याचा होलसेल व्यापार सुरू आहे. रोज सकाळी ५०० पेक्षा जास्त गोणींची येथे विक्री केली जात आहे. रोडच्या दोन्ही बाजूला कृषी माल ठेवला जात आहे. महापालिकेचे कार्यक्षेत्र असल्याचे कारण देऊन बाजार समिती काहीही कारवाई करत नाही. महापालिकेचे प्रशासन तक्रारी करूनही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत आहे. भाजीपाला घाऊक व्यापारी महासंघानेही याविषयी वारंवार तक्रारी दिल्या आहेत. परंतु या तक्रारींची फार गांभीर्याने दखल घेतली जात नाही. याच ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यरात्रीनंतर दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक फेरीवाले येथे व्यापार करत आहेत. येथील मुख्य रोडवरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचरा उचलण्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करू लागले आहे. येथील मोकळ्या इमारतीमध्ये अनधिकृतपणे खानावळ सुरू असूनही त्यावर काहीही कारवाई केली जात नाही.
भाजी मार्केटच्या बाहेरील उच्च विद्युतदाबाचा वीजवाहिन्या गेल्या आहेत. वीजवाहिन्यांच्या खालील जागा एपीएमसीला हस्तांतर करण्याची कार्यवाही सुरू आहे. या भूखंडावर काही दिवसांपासून अनधिकृतपणे डेब्रिजचा भराव केला जात आहे. या भूखंडाच्या कोपºयामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामाचा वापर बेकायदेशीरपणे फेरीवाले करत आहेत.
मार्केटमध्ये पाणीपुरवठा करणाºया विक्रेत्याने प्लॅस्टिकच्या मोठ्या कॅन ठेवण्याचे गोडाऊन तयार केले आहे. वास्तविक येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची आवश्यकता आहे. या परिसरामधील समस्या सोडविण्याकडे बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीही लक्ष देत नाहीत. यामुळे तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
>अभय कोणाचे?
मुख्य व विस्तारित भाजी मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार सुरू आहे. रोडवर कचºयाचे ढीग साचले आहेत. गुटखा विक्रेते व इतर फेरीवाल्यांनी मोकळ्या इमारतीचा ताबा घेतला आहे. याविषयी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने संबंधितांना नक्की अभय कोणाचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title:  Problems with the vegetable market, the absence of the APMC with the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा