नवी मुंबईत १५ कोटींचा १०७६ किलो गांजा केला नष्ट एनसीबीची कार्यवाही

By नारायण जाधव | Published: May 19, 2023 01:57 PM2023-05-19T13:57:50+5:302023-05-19T13:58:02+5:30

तळोजातील कारखान्यात केली प्रक्रिया.

Proceedings of NCB destroyed 1076 kg of ganja worth 15 crores in Navi Mumbai | नवी मुंबईत १५ कोटींचा १०७६ किलो गांजा केला नष्ट एनसीबीची कार्यवाही

नवी मुंबईत १५ कोटींचा १०७६ किलो गांजा केला नष्ट एनसीबीची कार्यवाही

googlenewsNext

नवी मुंबई - अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीच्या मुंबई झोनने  महामुंबईतील विविध कारवायांत जप्त केलेल्या १०७६ किलो गांजा शुक्रवारी नवी मुंबईतील तळोजा येथील केंद्रात नष्ट केला. नष्ट केलेल्या गांजाची किंमत १५ कोटीहून अधिक आहे. तळोजा एमआयडीसीतील नवी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पात रासायनिक प्रक्रिया करून हा गांजा नष्ट करण्यात आला.

अंमली पदार्थांची विधिवत विल्हेवाट लावण्यासाठी स्थापन केलेल्या, मुंबईच्या उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या मंजुरी नंतर हा १०७६ किलो गांजा नष्ट करण्यात आला.. यावेक्ळी मुंबई एनसीबी, उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीचे सदस्य व इतर अधिकारी हजर होते .

अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध विशेष मोहीम यापुढे ही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Proceedings of NCB destroyed 1076 kg of ganja worth 15 crores in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.