नवी मुंबई - अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीच्या मुंबई झोनने महामुंबईतील विविध कारवायांत जप्त केलेल्या १०७६ किलो गांजा शुक्रवारी नवी मुंबईतील तळोजा येथील केंद्रात नष्ट केला. नष्ट केलेल्या गांजाची किंमत १५ कोटीहून अधिक आहे. तळोजा एमआयडीसीतील नवी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पात रासायनिक प्रक्रिया करून हा गांजा नष्ट करण्यात आला.
अंमली पदार्थांची विधिवत विल्हेवाट लावण्यासाठी स्थापन केलेल्या, मुंबईच्या उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या मंजुरी नंतर हा १०७६ किलो गांजा नष्ट करण्यात आला.. यावेक्ळी मुंबई एनसीबी, उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीचे सदस्य व इतर अधिकारी हजर होते .
अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध विशेष मोहीम यापुढे ही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.