प्रक्रि या केलेले पाणी कारखान्यांना !

By admin | Published: May 11, 2016 02:18 AM2016-05-11T02:18:32+5:302016-05-11T02:18:32+5:30

पाण्याअभावी तळोजा एमआयडीसीतील अनेक कारखाने सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. धरणात पाणी नसल्याने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात केली जात आहे

Processed water factories! | प्रक्रि या केलेले पाणी कारखान्यांना !

प्रक्रि या केलेले पाणी कारखान्यांना !

Next

कळंबोली : पाण्याअभावी तळोजा एमआयडीसीतील अनेक कारखाने सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. धरणात पाणी नसल्याने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात केली जात आहे. पाण्यावाचून येथील उद्योग डबघाईला आले असून, त्यावर तोडगा म्हणून एमआयडीसीतील कारखान्यांना प्रक्रिया केलेले पाणी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय तर टळलेच त्याचबरोबर पाणी टंचाई व कपातीवर तोडगा निघेल, असा विश्वास सिडको आणि एमआयडीसीकडून व्यक्त होत आहे.
तळोजातील एकूण ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली आहे. या ठिकाणी आजमितीस ८२३ छोटेमोठे कारखाने आहेत. कोट्यवधींची उलाढाल होत असताना येथे पायाभूत सुविधांबरोबरच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा सूर उमटत होता. बारवी व शहाड या दोन पाणीपुरवठा केंद्रांतून तळोजा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ३८ एमएलडी पाणी रोज दिले जाते. पाणीपुरवठा विभागाने कारखानदारांसाठी ३० टक्के पाणीकपात सहा महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे. गुरुवार व शुक्र वार हे दोन दिवस पाणीकपात करण्यात येते. जलशुद्धीकरण केंद्रातून आठवड्यातून ४८ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शनिवारी सुध्दा कमी दाबाने पाणी होत असल्याने तीन दिवस एमआयडीसीतील कारखान्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरुवार, शुक्र वार आणि शनिवारी एमआयडीसीचा घसा कोरडा पडत आहे.
नेरूळ येथील सीईडीपी प्लाटमधून तळोजा एमआयडीसीला पाणी दिले तर पाणीटंचाई दूर होईल, हा उपाय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत सुचविण्यात आला होता. याखेरीज बाजूला असलेल्या सिडको वसाहतीतून जवळपास ५५ एमएलडी पाणी प्रक्रि या होऊन बाहेर पडते. त्यापैकी आठ एमएलडी पाणी गोल्फ कोर्स आणि उद्यानाकरिता वापरण्यात येते. उर्वरित पाणी खाडीला जाऊन मिळते. हे पाणी उरण येथील महाजनको कंपनीला वीजनिर्मितीकरिता देण्याचा प्रस्तावही पूर्वी होता, मात्र त्याबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत. म्हणून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर या वसाहतीतील मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया झालेले पाणी तळोजा एमआयडीसीतील कारखान्याला देण्याच्या दृष्टीने सिडकोने सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्रशासन याबाबत सकारात्मक असून, विशेष म्हणजे याकरिता जादा पैसे मोजण्याची सुध्दा गरज भासणार नाही. (वार्ताहर)

Web Title: Processed water factories!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.