ढोलताशांची मिरवणूक, पनवेलच्या शिवप्रेमींमध्ये जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 01:27 AM2020-02-20T01:27:29+5:302020-02-20T01:27:48+5:30

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या

The procession of the Dholtas, the Shiva lovers of Panvel, shines | ढोलताशांची मिरवणूक, पनवेलच्या शिवप्रेमींमध्ये जल्लोष

ढोलताशांची मिरवणूक, पनवेलच्या शिवप्रेमींमध्ये जल्लोष

Next

नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव शहरात उत्साहात साजरा झाला. शहरात विविध ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा नामगजर करण्यात आला. लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात शहरात रॅली काढण्यात आल्या, तसेच जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजनदेखील करण्यात आले होते.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, सभागृह नेते रवींद्र इथापे आदी नगरसेवक, महापालिका अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका मुख्यालयातदेखील शिवप्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. सानपाडा येथील डॉ. आर.एन. पाटील सूरज हॉस्पिटल, भारतीय जनता पक्ष व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात उपचारांसोबत मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन आर्यवर्त फाउंडेशनचे अजिंक्य घरत आणि भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या महामंत्री मंगल घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
सीवूड विभागात भाजप युवा मोर्चाचे दत्ता घंगाळे आणि प्रभाग क्र मांक १११च्या महिला प्रभाग अध्यक्ष अश्विनी घंगाळे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवसंकल्प सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या माध्यमातून वाशी शिवाजी चौक ते शंकरराव विश्वासराव विद्यालयापर्यंत लेझीम पथक आणि ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शंकरराव विश्वासराव विद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि आयसीएल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
घणसोली परिसरात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्या हस्ते शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. या वेळी परिवहन समितीचे माजी सभापती मोहन म्हात्रे, कवी शांताराम लोखंडे आदी उपस्थित होते.

पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
पनवेल शहरासह खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा आदी ठिकाणी शिवजयंतीनिमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व ठिकाणी भव्य मिरवणुकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्ताने पनवेल शहरात वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याव्यतिरिक्त खारघर शहरात शिवाजी महाराज एक महान योद्धा या विषयावर निबंध लेखन स्पर्धांचेदेखील आयोजन भारत रक्षा मंचच्या वतीने करण्यात आले होते. खारघर शहरातील अनेक शाळांमध्ये या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. सायंकाळी मराठा समाज, खारघर यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्र मात आपला सहभाग नोंदवला.

लेझीम पथकासह मिरवणूक
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्र मात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सभागृह नेते परेश ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने नगरसेवक व शहरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारी उपस्थिती होते. त्याचबरोबर या मिरवणुकीत विविध शाळा, संस्थांचे विद्यार्थी, ढोलताशा पथक, लेझीम पथक या भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवाजी चौकातून निघालेल्या मिरवणुकीचा टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला.

भव्य रॅलीचे आयोजन
ऐरोली प्रभाग क्र मांक १५ येथे गणेश रहिवासी सेवा मंडळ व माजी नगरसेवक अशोक पाटील यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरात भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी माजी आमदार संदीप नाईक, नगरसेविका संगीता पाटील, कैलास गायकर, राजेंद्र जोशी, नामदेव कुंभार, सदानंद दरेकर, शिवाजी कोळी, प्रसाद शिंदे, किसन शिंदे, राजेश शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: The procession of the Dholtas, the Shiva lovers of Panvel, shines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.