सौरऊर्जा प्रकल्पातून ८.५ लाख युनिटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:02 AM2018-08-08T03:02:56+5:302018-08-08T03:03:06+5:30

सरकारने २०२२ पर्यंत दोन लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे.

Production of 8.5 lakh units of solar power project | सौरऊर्जा प्रकल्पातून ८.५ लाख युनिटची निर्मिती

सौरऊर्जा प्रकल्पातून ८.५ लाख युनिटची निर्मिती

Next

उरण : सरकारने २०२२ पर्यंत दोन लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे. पेट्रोल आणि डिझेल सारख्या प्रदूषणकारी इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व पर्यावरण पूरक अशी शुद्ध ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.
जेएनपीटीने सौरऊर्जेच्या पॅनेलची जेएनपीटी वसाहत व व्यावसायिक ठिकाणीच्या विविध छतावर उभारणी केली आहे. ज्यामुळे सौरऊर्जेची निर्मिती होऊन पारंपरिक ऊर्जेवर कमीत कमी विसंबून राहता येणार आहे. यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (नवीन आणि नूतनीकरणक्षम मंत्रालय) कडून १५ टक्के अनुदान दिले जाते. प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने ८२२ किलो वॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. जेएनपीटी हॉस्पिटल येथे बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनेलमधून सर्वाधिक २.७ युनिट, प्रशासन भवनावरील पॅनेलमधून १.७ युनिट, पोर्ट युजर इमारतीवरील पॅनेलमधून १.२ युनिट शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालयावरील पॅनेलमधून १.०६ युनिट अशी सर्व मिळून ८.५ लाख युनिट ऊर्जेची निर्मिती वर्ष २०१७-१८ मध्ये करण्यात आली आहे. ज्यामुळे १.२ कोटी रु पयांची बचत मार्च २०१८ पर्यंत झाली आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प सेंट मेरी विद्यालय, आयईएस विद्यालय, पीयूबी, प्रशासन भवन, अधिकारी क्लब, स्टाफ क्लब, एमपी हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालय आणि रुग्णालयात उभारण्यात आले.
>शुद्ध ऊर्जा निर्मिती करणे व प्रदूषण करणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी करणे ही काळाची गरज आहे. भारताला पर्यायी नैसर्गिक ऊर्जा निर्मितीची महत्त्वाची संधी प्राप्त झाली आहे. जेएनपीटी आपल्या मर्यादित वापरासाठी अधिकतम सौरऊर्जा निर्मितीसाठी उत्सुक असून पारंपरिक मर्यादित ऊर्जेवर विसंबून राहणे कमी करत आहे. जेएनपीटी ने अलीकडेच स्वच्छ पर्यावरण मोहिमेअंतर्गत मोबाइल पर्यावरण निरीक्षण वाहनाचा शुभारंभ केला आहे, ज्यामुळे हवेतील रिअल टाइम एअर क्वालिटीचे निरीक्षण करता येणार आहे. - नीरज बन्सल, अध्यक्ष, जेएनपीटी

Web Title: Production of 8.5 lakh units of solar power project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.