सिडकोविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

By admin | Published: December 30, 2016 04:21 AM2016-12-30T04:21:26+5:302016-12-30T04:21:26+5:30

सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. त्यास विरोध करण्यासाठी न्हावा-शिवडी महामार्गबाधित प्रकल्पग्रस्त

Projected aggressor against CIDCO | सिडकोविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

सिडकोविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

Next

पनवेल : सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. त्यास विरोध करण्यासाठी न्हावा-शिवडी महामार्गबाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यामुळे अखेर पथकाला माघार घेऊन परतावे लागले.
न्हावा-शिवडी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यावेळी एम.एम.आर.डी.ए. व सिडको प्रशासनाने सागरी सेतूबाधित शेतकऱ्यांना नवी मुंबई विमानतळबाधित शेतकऱ्यांप्रमाणे साडेबावीस टक्के भूखंड परतावा देण्याचे मान्य केले होते. प्रकल्पग्रस्त गावांना सुविधा देण्याचे व मच्छीमारांना पुनर्वसन पॅकेज देण्याचे मान्य केले होते. मात्र आजपर्यंत ते दिलेले नाही. प्रकल्प पूर्ण होण्यास २ ते ३ वर्षे असताना बुधवार २८ डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात सिडकोच्या अतिक्र मण विरोधी पथकाने महामार्गावरील स्ट्रक्चर्स काढण्यास सुरु वात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी संघर्ष समितीचे नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून दि. बा. पाटील अमर रहे, प्रकल्पग्रस्तांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Web Title: Projected aggressor against CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.