पनवेल : सिडकोने ४४ सुरक्षारक्षकांना तडकाफडकी कामावरून कमी केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कारवाईचा निषेध करून वरचे ओवळे गावातील महिलांनी विमानतळाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला.सिडको प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करत आहेत. प्रकल्पग्रस्तांविषयी पूर्वग्रह दूषित वृत्तीने वर्तन केले जात आहे. सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हुकूमशाही पद्धतीने कामावरून कमी केले आहे. या कारवाईचा सर्वत्र निषेध होत आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विमानतळाचे काम सुरू झाले असताना, ओवळे गावातील ५० ते ६० महिलांनी एकत्र येऊन गावातील घरापासून मंदिराकडे जाणाºया रस्त्याचे काम बंद केले. या वेळी पनवेल शहर पोलिसांनी त्या महिलांना अटक करून समज देऊन सोडण्यात आले. सिडको अथवा कंत्राटदार कोणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने, या वेळी कोणावरही गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली. सिडको विरोधात प्रकल्पग्रस्त महिला आक्र मक झाल्या आहेत. जोपर्यंत पुनर्वसन प्रक्रि या पूर्ण केली जात नाही. सुरक्षारक्षकांना पुन्हा सेवेत घेतले जात नाही व दोषी आधिकाºयांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.प्रकल्पग्रस्तांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मीडियामधूनही सिडकोच्या हुकूमशाहीविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नवी मुंबई व पनवेल परिसरामधील प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते व संघटनाही सुरक्षारक्षकांना न्याय मिळावा, अशी मागणी करू लागल्या आहेत.
सिडको विरोधात प्रकल्पग्रस्त महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:05 AM