शहरातील रिक्षांवर स्वच्छतेचा प्रचार; महापालिकेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 10:40 PM2019-12-08T22:40:29+5:302019-12-08T22:41:09+5:30

स्वच्छतेच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांचा प्रभावी उपयोग केला जात असून, यामध्ये सामूहिक प्रवासी वाहतुकीच्या साधनांवरही स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषंगाने प्रसिद्धी केली जात आहे.

The promotion of cleanliness on city streets; Municipal activities | शहरातील रिक्षांवर स्वच्छतेचा प्रचार; महापालिकेचा उपक्रम

शहरातील रिक्षांवर स्वच्छतेचा प्रचार; महापालिकेचा उपक्रम

Next

नवी मुंबई : स्वच्छतेच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांचा प्रभावी उपयोग केला जात असून, यामध्ये सामूहिक प्रवासी वाहतुकीच्या साधनांवरही स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषंगाने प्रसिद्धी केली जात आहे. यामध्ये महापालिकेच्या एनएमएमटी बसेसप्रमाणेच रिक्षांवरही स्वच्छतेसाठी सूचना देणारे बॅनर प्रदर्शित करून स्वच्छता प्रसाराची संकल्पना घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबविली जात आहे.
शहरातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रि य सहभाग घ्यावा आणि शहराचे नामांकन उंचवावे, असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

स्वच्छता ही सवय बनून शून्य कचरा ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणे शक्य होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महापालिका विविध माध्यमांतून करीत असून, रिक्षा प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता रिक्षाचालकांमार्फत स्वच्छतेचा
संदेश प्रसारित करण्यास सुरु वात करण्यात आली आहे.

याविषयी विविध रिक्षा संघटना, तसेच रिक्षा मालक-चालक यांच्याशी विभागीय पातळीवर संपर्क साधला जात असून स्वच्छतेविषयी त्यांच्यामार्फत रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांचे प्रबोधन करण्यात यावे, असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या अनुषंगाने रिक्षांमधून प्रवास करणाºया प्रवाशांना त्यांच्याकडील छोट्या स्वरूपातील कचरा टाकण्यासाठी रिक्षामध्ये छोटा कचºयाचा डबा बसविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून नागरिकांना सहज दिसेल, अशाप्रकारे रिक्षावर व रिक्षाच्या आत प्रदर्शित करण्यासाठी स्वच्छता संदेशाचे स्टिकर्स देण्यात येत आहेत. स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.
बसेसप्रमाणेच रिक्षा हेदेखील प्रवासी वापराचे महत्त्वाचे वाहन असून, रिक्षांमधील स्वच्छता संदेशाद्वारेही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा

महापालिका प्रयत्न करीत असून, स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये आपले देशातील स्वच्छतेचे मानांकन उंचाविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: The promotion of cleanliness on city streets; Municipal activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.