शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पनवेलमध्ये प्रचाराची धामधूम

By admin | Published: May 10, 2017 12:31 AM

महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही ज्येष्ठ मंडळींनाही

वैभव गायकर। लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही ज्येष्ठ मंडळींनाही निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरविण्यात येणार आहे. तरुण आणि ज्येष्ठांचा मेळ घालण्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांना यश मिळालेले आहे. एकंदरीत पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल, अशा विश्वास वर्तविण्यात येत आहे.पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत बदलत्या समीकरणात उच्चशिक्षित तरुण चेहरे पुढे येवू लागले आहे. युथ ब्रिगेडबरोबरच पनवेल महानगरपालिका निवडणुकीत अनुभवी उमेदवारांनाही तिकीट दिले आहे. प्रभाग क्र मांक-१५ सर्वसाधारण महिलेकरिता राखीव असलेल्या जागेवर शेकाप आघाडीतून कुसुम काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक विजय काळे यांच्या त्या मातोश्री आहेत. गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतलेले दिवंगत पुरोगामी विचारवंत बबनराव काळे यांच्या त्या पत्नी होय. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना त्यांनी एकत्रित केले. कुसुम काळे यांच्यासारख्या अनुभवी महिलेला उमेदवारी देण्यात आलेली आहे. याच प्रभागातून काँग्रेस नेते श्याम म्हात्रे यांची कन्या श्रुती म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणार पहिल्यांदाच आपले नशीब आजमावणार आहे. त्यांचे पिता श्याम म्हात्रे यांनी केलेल्या समाजोपयोगी कामाचा फायदा त्यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. याच प्रभागातून भाजपाचे ज्येष्ठ स्थानिक नेते एकनाथ गायकवाड यांना अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या जागेतून उमेदवारी निश्चित झालेली आहे. प्रभाग क्र मांक १४मधून माजी बांधकाम व महिला बालकल्याण सभापती दर्शना निकम यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांच्या त्या पत्नी आहेत. निकम कुटुंबीयांचा बावनबंगला, खांदा गाव, मोहल्ल्यात चांगला संपर्कआहे. याच प्रभागात काँग्रेसच्या निर्मला म्हात्रे आपले नशीब आजमावणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाकडून कर्नाळा स्पोटर््स अकादमीचे अध्यक्ष मुकुंद म्हात्रे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. प्रभाग क्र मांक ११ मध्ये शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुनंदा अंकुश अवारे या इच्छुक आहेत. वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या अवारे या मूळच्या सातारा जिल्ह्यातील आहे. पती अंकुश अवारे बेस्टमधून निवृत्त झालेले आहेत, तर मुलगा अनिकेत व्यवसायाने डॉक्टर आहेत. या दोघांची मदत सुनंदा अवारे यांना होणार आहे. कामोठे वसाहतीतून रेश्मा देशमुख यांनी सुध्दा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. नवीन पनवेलच्या महिला संघटक प्रतिभा सावंत यांना १६ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग-२ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णुशेठ जोशी यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला शेकापने रणांगणात उतरवले आहे, तर प्रभाग ८ मधून सेनेच्या जोत्स्ना गडहीरे या सर्वसाधारण राखीव जागेतून लढत आहेत.