मालमत्ता कर, पाण्यासह वीजबिलात सवलत द्या, व्यापारी महासंघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:04 AM2020-06-25T01:04:08+5:302020-06-25T01:04:15+5:30

महामारीमध्येही नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांना कोरोना योद्ध्याचा सन्मान मिळावा व त्यांचा विमा शासनाने काढावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.

Property tax, water and electricity concessions, demand of trade federation | मालमत्ता कर, पाण्यासह वीजबिलात सवलत द्या, व्यापारी महासंघाची मागणी

मालमत्ता कर, पाण्यासह वीजबिलात सवलत द्या, व्यापारी महासंघाची मागणी

googlenewsNext

नवी मुंबई : कोरोनामुळे सर्वच व्यवसायांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. या संकटामधून बाहेर पडून व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी शासनासह महानगरपालिकेने मदतीचा हात दिला पाहिजे. मालमत्ता कर, पाणी व वीजबिलामध्ये सवलत देणे आवश्यक आहे. जीएसटीमध्येही सूट मिळाली पाहिजे व महामारीमध्येही नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांना कोरोना योद्ध्याचा सन्मान मिळावा व त्यांचा विमा शासनाने काढावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.
‘लोकमत’ने नवी मुंबई व्यापारी महासंघाच्या पदाधिकाºयांबरोबर वेबिनारचे आयोजन केले होते. महासंघाचे अध्यक्ष प्रवीण जैन यांच्यासह अनेक मान्यवर या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. शहरातील सर्वच उद्योगांसमोरील समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बहुतांश सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. सर्वांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कपडा दुकानांमधील कपड खराब झाले आहेत. प्लायवूडच्या दुकानांमधील साहित्याला बुरशी पकडून माल खराब झाला आहे. तीन महिने दुकाने बंद राहिल्यामुळे आतमधील साहित्य खराब झाले आहे. व्यापारी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत. अनेक जण भाडेतत्त्वावर दुकाने घेऊन व्यापार करत आहेत. दुकाने बंद असली, तरी त्यांना भाडे द्यावे लागते. कामगारांना वेतन द्यावे लागले आहे. दुकानांच्या देखभाली व दुरुस्तीच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. उत्पन्न काहीच नाही, परंतु खर्च मात्र सुरूच असून, व्यापारी अडचणीत आले आहेत. या संकटातून बाहेर येण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन व महानगरपालिकेने मदतीचा हात देण्याची आवश्यकता असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेने सहा महिन्यांचा मालमत्ता कर माफ करणे आवश्यक आहे. उत्पन्नच नसल्यामुळे मालमत्ता कर भरणे अनेकांना अशक्य होणार आहे. लॉकडाऊनपासून दुकाने बंद आहेत. यामुळे तेथील पाण्याचा वापर करण्यात आला नाही, परंतु महानगरपालिका पाणी बिलाची आकारणी करत आहे. व्यापाºयांना या कालावधीमधील पाणी व वीज बिल माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. जीएसटीमध्येही सहा महिन्यांसाठी सूट देण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊन आणि आता अनलॉकमध्ये सेवा देणाºया सर्व व्यापाºयांनाही कोरोना योद्ध्याचा बहुमान देऊन त्यांचा विमा काढण्यात यावा, अशी मागणीही वेबिनारमध्ये व्यापाºयांनी केली.
वेबिनारमध्ये मोहन गुरनानी, प्रवीण जैन, प्रमोद जोशी, देव शर्मा, विवेक भालेराव, सुनील छाजेड, दर्शन पोपट, नदीम रिझवी, विजय थामाने, शरद शहा, किशोर जैन, जगदीश कुमावत, रवी मेहरा, अ‍ॅड. कैलाश नायर, अमरदीप सिंग व इतर पदाधिकाºयांनी सहभाग घेतला.
>व्यापाºयांना कोरोना योद्ध्यांचा दर्जा देऊन शासनाने त्यांचा विमा उतरवावा. जीएसटीसह इतर करांमध्ये सवलत मिळावी. व्यापाºयांविषयी निर्णय घेताना संघटनांना विश्वासात घेऊन, या संकटातून बाहेर येण्यासाठी महानगरपालिका, राज्य व केंद्र शासनाने मदत करावी.
- मोहन गुरनानी, अध्यक्ष - चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (सीएएमआयटी)
मालमत्ता कर, पाण्यासह वीजबिलामध्ये सूट मिळाली पाहिजे. कामगार कायद्यामध्ये काही सुधारणा करावी. छोट्या व्यापाºयांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी विशेष सवलत देण्यात यावी.
- प्रमोद जोशी, महासचिव,
नवी मुंबई व्यापारी महासंघ
कोरोनामुळे सर्वच व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी महानगरपालिकेने व शासनाने मदत करणे आवश्यक आहे. जीएसटीसह इतर करांमध्ये सूट देऊन ठोस मदत करण्यात यावी. अनेक छोटे प्रश्न निर्माण होत असून तेही सोडविण्यात यावेत.
- देव शर्मा, अध्यक्ष, वाशी मर्चंट असोसिएशन व खजिनदार महासंघ
>महिन्यातून १५ दिवस दुकाने सुरू व १५ दिवस बंद ठेवण्यामुळे नुकसान होत आहे. सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद करण्याच्या नियमात बदल करण्यात यावा व किमान साडेसात वाजेपर्यंत व्यापार करण्यास परवानगी मिळावी.
- नदीम रिझवी, सचीव, नवी मुंबई टू व्हीलर्स असोसिएशन
तुर्भे परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. त्यामुळे व्यवसाय करताना अनेक अडचणी येत आहेत. महानगरपालिकेने दुकाने सुरू ठेवण्यासाठी दिलेला वेळ अपुरा असून तो वाढवून मिळावा.
- दर्शन पोपट, सदस्य, नवी मुंबई
स्टोन ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन

Web Title: Property tax, water and electricity concessions, demand of trade federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.